महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तेजस ठाकरे अन् सहकाऱ्यांनी शोधली पालीची दुर्मिळ प्रजात - tejas thackeray research lizard

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलाने तेजस ठाकरे आणि त्याचा सहकारी अक्षय खांडेकर यांच्या टीमने पुन्हा एकदा नवीन पालींच्या प्रजातींचा शोध लावला आहे. कर्नाटकातील सकलेशपुरच्या जंगलात उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या आहेत.

tejas thackeray
तेजस ठाकरे अन् सहकाऱ्यांनी शोधली पालीची दूर्मीळ प्रजात

By

Published : Jun 19, 2020, 12:30 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र मुलगा तेजस ठाकरे आणि त्याचा सहकारी अक्षय खांडेकर यांच्या टीमने पुन्हा एकदा नवीन पालींच्या प्रजातींचा शोध लावला आहे. कर्नाटकातील सकलेशपूरच्या जंगलात उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम घाटातील जैववैविध्यात भर पडली आहे. तेजस ठाकरे आणि त्याचा मित्रे हे दोघेही वन्यजीव संशोधक आहेत. त्यांनी या आगोदर सुद्धा अशा प्रकारचे संशोधन केले आहे.

तेजस ठाकरे अन् सहकाऱ्यांनी शोधली पालीची दूर्मीळ प्रजात

भारतात वेगवेगळ्या पन्नास पालींच्या प्रजाती आढळतात. त्यात आता गोलाकार मोठ्या बुबळांच्या या पाली त्यांच्या वेगळ्या शरीर रचनेमुळे प्राणीतज्ञांचे लक्ष वेधून घेत आहेत. तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि सौनक पाल या चार संशोधकांनी 2014 सालीच काही पाली शोधून काढल्या होत्या. मात्र, गेली पाच वर्षे या दुर्मिळ प्रजातींच्या पालींवर जणुकीय तसेच इतर पालींपेक्षा या पाली वेगळ्या का आहेत? यावर प्राणी शरीर शास्त्रांच्या नियमानुसार अनेक सविस्तर संशोधन करण्यात आले.

नव्याने शोधण्यात आलेल्या दुर्मिळ पालीचे नाव ‘मँग्निफिसंट डवार्फ गेको’ असे करण्यात आले आहे. या चारही तरुणांच्या संशोधक टीमने नव्या प्रजातींच्या पालीवर तयार केलेला शोधनिबंध आंतराराष्ट्रीय ख्यातीच्या 'झुटाक्सा' या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details