मुंबईTeen Agers Girls Molestation: पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही बेशुद्ध अवस्थेत असताना आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केले. याप्रकरणी आरोपी रोहिदास सोळंकी (वय ४०) याला काल रात्री उशिरा जे जे मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा भायखळा परिसरात राहणारा आहे.
मुलीने गोळ्या खाल्ल्याने प्रकृती बिघडली:पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी ही ७ ऑक्टोबरला जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. ७ ऑक्टोबरला दुपारी १ वाजताच्या सुमारास पीडित मुलीस तिच्या आई-वडिलांनी ते यापूर्वी राहत असलेल्या मानखुर्द गोवंडी येथे तिच्यासोबत येण्यास नकार दिला होता. त्यामुळे तिने रागाच्या भरात राहत्या घरी तिच्या वडिलांच्या मानसिक उपचाराच्या गोळ्या खाल्ल्या. यामुळे तिला ७ ऑक्टोबरला सर जे जे रुग्णालयात एमआयसीयु मध्ये दाखल केले होते.
मदत करण्याच्या बहाण्याने केला मुलीचा विनयभंग:८ ऑक्टोबरला सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास आरोपी रोहिदास सोळंकी याने खराब झालेले मुलीचे डायपर व बेड बदलत असताना रुग्णाची मदत करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. पीडित मुलीच्या आईने याची फिर्याद जे जे मार्ग पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरून तक्रारदार महिलेचा सविस्तर जबाब नोंदवून आरोपीविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम 354 सह कलम 8, 10, 12 पोक्सो कायदा कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी रोहिदास सोळंकीला न्यायालयात हजर केले असता त्याला ११ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ठाण्यातही घडली होती अशीच घटना:ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे एप्रिल, 2023 रोजी एका आरोपीने प्रसाद आणायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम 354 (ब), 354 सह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. मात्र, गुन्हा दाखल होऊन पाच दिवस झाले असले तरी आरोपी अद्याप फरार असल्याने पीडित मुलीचे कुटुंब भीतीच्या छायेत जगत होते.
हेही वाचा:
- मुंबईत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक
- Molesting Minor Girl : वसईत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मौलानाला नागिरकांनी चोप देत केले पोलिसांच्या स्वाधीन
- साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचार करतना डॉक्टरकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल