मुंबई - राज्यातील शाळा सुरू करण्यासाठीचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे उद्या १५ जून रोजी शिक्षकांनी शाळांमध्ये हजर राहू नये, आपल्या घरी राहुन वर्क फ्रॉम होम करावे, असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून दिला आहे.
शिक्षकांनो, उद्या शाळांमध्ये हजर राहू नका, वर्क फ्रॉम होम करा...
शिक्षकांनी उद्या, १५ जून रोजी शाळांमध्ये हजर राहण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या घरूनच वर्क फ्रॉम होम करावे. शाळा कधी सुरू करायच्या यासाठीचा निर्णय उद्या मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली असल्याचे आमदार कपिल पाटील यांनी सांगितले.
पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली असताना त्यासाठीचा निरोप मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिला असल्याची माहिती त्यांनी रात्री उशिरा दिली. शिक्षकांनी उद्या, १५ जून रोजी शाळांमध्ये हजर राहण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या घरूनच वर्क फ्रॉम होम करावे. शाळा कधी सुरू करायच्या यासाठीचा निर्णय उद्या मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल. त्यासाठीची माहिती दिली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्याला सांगितली असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. दरम्यान रात्री उशिरा शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनीही आपल्याला रात्री उशिरापर्यंत यासाठीचे आदेश काढले जाणार असल्याची माहिती दिल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.