मुंबई - शिक्षकांना शाळांमध्ये हजर राहण्याचे शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशावर राज्यभरातील शिक्षक संघटनांनी आक्षेप नोंदवले आहेत. त्यातच मुंबईतील सायन येथील माध्यमिक शाळेतील तीन शिक्षकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आल्याने शाळांमध्ये शिक्षकांना हजर राहण्याचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शाळांमध्ये शिक्षकांना हजर राहण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले असले तरी तो आदेश अद्यापही शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली नाही. मात्र, त्यापूर्वीच मुंबईतील एका शाळेत तीन शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने त्यावर सोमवारी दुपारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत होणाऱ्या शिक्षक आमदारांच्या बैठकीत पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून सायन येथील महापालिकेची माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकांना विविध कामानिमित्त बोलावले जात होते. यातील एका शिक्षकाला ऑगस्टमध्ये करोनाची लागण झाली. तरीही शिक्षकांना बोलावणे कायम ठेवल्याने सप्टेंबर महिन्यात आणखी एका शिक्षकाला करोनाची लागण झाली. यानंतर पुन्हा 22 ऑक्टोबरला सर्व शिक्षकांना शाळेत बोलावले. यामुळे 24 ऑक्टोबरला पुन्हा एका शिक्षकाला करोनाची लागणी झाल्याचे समोर आले आहे. यातील एका शिक्षकावर रुग्णालयात उपचार सुरू ओहत.
शिक्षण विभागाकडून बेदखल -
मुंबईत कारोनाची स्थिती अद्यापही तितकी सुधारलेली नाही. यामुळे शिक्षकांना शाळांमध्ये बोलावले जाऊ नये. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेसोबतच शिक्षक भारती, शिक्षक परिषदेकडून वेळोवेळी शालेय शिक्षण विभागाकडे विनंती करण्यात आली. मात्र, त्याकडे शिक्षक निरीक्षक कार्यालयाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केला आहे.
वेतन कपातीचे मेसेज -