मुंबई- राज्यातील विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी अर्थ विभागाने तरतूद केली. त्यासाठी नेमलेल्या उपसमितीच्या बैठकीनंतर ८ दिवसांत कॅबिनेटची बैठक घेऊन अनुदानाचा प्रश्न मार्गी लावू, येत्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शिक्षकांचे वेतन सुरू होईल, या राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनपूर्तीसाठी मंत्रालयात कोणतीही सकारात्मक हालचाल दिसून येत नसल्याने पुन्हा अनुदानाची आशा मावळलेल्या शिक्षकांनी मुंबईत आझाद मैदानावर गेल्या चार दिवसांपासून अर्धनग्न आंदोलन केले आहे. ते आंदोलन सोमवारी तीव्र झाले आहे.
अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षक आक्रमक; आझाद मैदानावर पोलिसांचा शिक्षकांवर लाठीचार्ज - अर्धनग्न आंदोलन
शिक्षक आझाद मैदानातून थेट मंत्रालयावर मोठ्या संख्येने जायला निघाले असताना पोलीस व शिक्षक यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी शिक्षक आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्जदेखील केला आहे.
मुंबई
शिक्षक आझाद मैदानातून थेट मंत्रालयावर मोठ्या संख्येने जायला निघाले असताना. पोलीस व शिक्षक यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी शिक्षक आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्जदेखील केला आहे. यामुळे अनेक शिक्षक जखमीदेखील झाले आहेत.