मुंबई - मुंबईसह राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांवर मागील २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या शिक्षकांनी बुधवारी जोगेश्वरी येथील शिक्षण उपनिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. या मूक मोर्चात १ हजाराहून अधिक शिक्षक उपस्थित राहणार आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या धोरणाच्या विरोधात निषेध नोंदवला जाणार असल्याची माहिती कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष संजय डावरे यांनी दिली.
नागपूर येथे राज्य हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्य सरकारकडून अनुदानावर आलेल्या शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा. त्यांच्या अनुदानाचा प्रश्न तातडीने सोडवावा, या प्रमुख मागणीसाठी हा मूक मोर्चा काढला जाणार असल्याचे सांगण्यात आले.