मुंबई : कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या एका पालकाने त्यांच्या दोन वर्षीय मुलास एमजी रोडवरील रायम्स अँड रंबल या प्ले ग्रुपमध्ये प्रवेश घेतला होता. जिनल छेडा, मेघना जोशी आणि विराज उपाध्याय यांनी सप्टेंबर 2012 मध्ये हा प्ले ग्रुप सुरू केला होता. आरोपी असलेली जीनल छेडा आणि तिची सहशिक्षिका भक्ती शहा या प्ले ग्रुपमध्ये काम करत होत्या. तक्रारदार पालकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा सप्टेंबरपासून या प्ले ग्रुपमध्ये जात होता. मात्र काही दिवसांपासून चिडचिड करू लागला होता. घरातील लोकांना मारण्यासाठी धावायचा. त्यामुळे पालकांना त्याच्या स्वभावात अचानक बदल झालेला दिसून आला.
दोन शिक्षकांना नोटीस बजावली: याबाबत तक्रारदार पालकांनी प्ले ग्रुपचे संचालक मेघना जोशी आणि उपाध्याय यांना माहिती दिली. त्यावर वर्गातील एखादा मुलगा चुकीची अॅक्टिव्हिटी करत असेल त्यामुळे मुले चिडचिड करतात असे त्यांना थातूरमातूर उत्तर दिले. कांदिवली पोलीस ठाण्यात दोन्ही शिक्षकांच्या विरोधात बाल न्याय अधिनियम 2000चे कलम 23 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक दीपशिखा वारे या घटनेबाबत गुन्हा दाखल असल्यास दुजोरा दिला आहे. तसेच दोन शिक्षकांना नोटीस बजावली असल्याचे वारे यांनी सांगितले आहे.