मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये डीटीएड, बीएड उमेदवारांच्या शिक्षक भरती परीक्षा पुढे ढकलण्याबाबत जोरदार मागणी होत आहे. त्याचे कारण असे की या संपूर्ण परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. यासाठी वेळ कमी आहे. त्याच दरम्यान राज्यातील डीएड, बीएड आणि सोलापूर विद्यापीठाच्या पदवी तसे पदव्युत्तर परीक्षा आहेत. त्यामुळे एकाच वेळेला याही परीक्षा त्याही परीक्षा असल्यामुळे सर्वांची अडचण होणार आहे. परिणामी शिक्षक वर्तुळातून याबाबतचे वेळापत्रक बदलण्याची मागणी होत आहे.
वेळ अपुरा पडणार : राज्यामध्ये दरवर्षी शिक्षक पात्रता परीक्षा ज्याला संक्षिप्त नाव टेट (TET) असे म्हटले जाते. ती परीक्षा आता तोंडावर आलेली आहे. मात्र या परीक्षेसाठी शासनाने सर्व प्रक्रियांकरिता एकूण केवळ 20 ते 22 दिवसाचा वेळ दिलेला आहे. हा वेळ अपुरा आहे. त्याचे कारण राज्यातील अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या परीक्षा आहेत. त्यामुळे एकच उमेदवार आणि त्याच्या चार चार परीक्षा कशा द्यायच्या याची चिंता शिक्षक वर्तुळामध्ये आहे.
इतर विद्यापीठातही परीक्षा त्याच काळात : राज्यातील सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा आहे. तसेच इतरही विद्यापीठातील विधीत परीक्षा आहे. त्याशिवाय डीएड आणि बीएडधारक यांच्या देखील परीक्षा याच कालावधीमध्ये होत आहेत. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये त्याच्या नियोजनामध्ये बदल करण्यासाठीची मागणी जोर धरत आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रक्रियेसाठी वेळ अपूरा :राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती केली जाते. आणि ही भरती होण्यासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अत्यावश्यक असते. शिक्षक पात्रता परीक्षा लांबण्याची 100 टक्के शक्यता निर्माण झालेली आहे. त्याचे कारण असं ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आणि या परीक्षेसाठी जो वेळ दिलेला आहे तो अत्यंत कमी म्हणजे 22 दिवसाचा वेळ दिलेला आहे आणि दरम्यान इतर परीक्षा आल्यामुळे सर्व पात्र उमेदवारांनी ही परीक्षा द्यायची कशी असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे. याशिवाय केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजे केवीएस यासाठी प्राथमिक शिक्षकांच्या पदासाठी 21 फेब्रुवारी ते 6 मार्च 2023 याच काळामध्ये परीक्षा आहे. त्यामुळे ती परीक्षा देखील आहे. शिक्षकांचे म्हणणे आहे की, एकाच वेळेला चार चार परीक्षा असल्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा कशी द्यायची.
सगळ्यांची कसोटी लागली : यासंदर्भात शिक्षक भारतीचे नेते सुभाष मोरे यांच्यासोबत ईटीवी भारत वतीने संवाद केला असता त्यांनी सांगितले की टेट साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाने जे काही नियोजन केलेले आहे. तो वेळ केवळ आठ दिवसांचा आहे. त्यामुळे सगळ्यांची कसोटी लागलेली आहे. परीक्षेच्या जाहीर सूचनांमध्ये जे उमेदवार आहे. त्यांच्या संख्येनुसार भौतिक सुविधांमध्ये बदलदेखील होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर शासनाने वेळापत्रकात बदल केला. तर सर्वांना परीक्षा देता येईल.
एकच परीक्षा एका वेळेला : ज्या उद्देशासाठी शिक्षक पात्रता परीक्षा आहे. तो उद्देश साध्य करायचा असेल तर राज्यातील शिक्षकांच्या संदर्भातील एकच परीक्षा एका वेळेला असायला हवी. एकाच वेळेला केंद्रीय विद्यालयांच्या शिक्षक भरतीची परीक्षा, डीएड बीएड धारकांची परीक्षा विविध विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा. त्यामुळे सर्व शिक्षक मंडळी धास्तावलेली आहे शासन या संदर्भात काय तोडगा काढत आहे ते येत्या एक-दोन दिवसात समजेल.
हेही वाचा :Aero Show Bengaluru : एरोस्पेस प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी बंगळुरूत पोहचले