मुंबई - गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीशा उत्साहात यावर्षी गणेशोत्सव साजरा होताना दिसत आहेत. नातेवाईक, मित्र-मैत्रिणी उत्सवासाठी घरी जाताना दिसत आहेत. यावर्षी घरगुती गणपतीच्या माध्यमातून सामाजिक संदेशही देण्यात येत आहेत. पेशाने शिक्षक असलेले दीपक गभाले यांनी यावर्षी देखील घरच्या घरीच बाप्पाची मूर्ती कागदापासून तयार करत पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा संदेश दिला आहे.
तयार केली पर्यावरणपूरक कागदाची गणेश मूर्ती -
मागील वर्षी कोरोनामुळे भितीदायक परिस्थितीमध्ये सर्व सण साजरा करावे लागले होते. गेल्यावर्षी गभाले कुटुंबातील सर्वांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा दरवर्षी साजरा होणारा गणेशोत्सव कसा साजरा करावा असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला होता. त्यावेळी त्यांनी घरच्या घरी कागदापासून मूर्ती तयार केली आहे. दरवर्षी सुरू असलेल्या गणेशोत्सवात खंड पडू दिले नाही. यंदा सर्व परिस्थिती चांगली असताना देखील त्यांनी पुन्हा कागदाची मूर्ती तयार करण्याचे ठरवले होते.