मुंबई-परिवहन विभागाने 1 मार्चपासून मुंबई व उपनगरातील टॅक्सी व रिक्षाचे भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार टॅक्सी-रिक्षाचे मीटर रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया सुरू झालेली असून महामुंबई गुरुवारपर्यंत 14 हजार 638 रिक्षा चालकांनी मीटर रिकॅलिब्रेशन केले आहे. तर टॅक्सी चालकांनी मात्र या प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबई गुरुवारपर्यंत फक्त 18 टॅक्सी चालकांनी मीटर कॅलिब्रेशन केले आहे.
12 दिवसांत 14 हजारपेक्षा रिक्षाचे रिकॅलिब्रेशन
मुंबई सेंट्रल आरटीओमध्ये आतापर्यंत एकही रिक्षा किंवा टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन झालेले नाही. याउलट वडाळा आरटीओमध्ये 17 टॅक्सी आणि 6 हजार 668 रिक्षाचे रिकॅलिब्रेशन पार पडली आहे. तर अंधेरी आरटीओमध्येही 3 हजार 131 रिक्षाचालकांनी मीटरचे कॅलिब्रेशन करून घेतले आहे. तर बोरिवली आरटीओमध्ये 499 रिक्षा चालकांनी रिकॅलिब्रेशन करण्यात आलेले आहे. नवी मुंबई आणि पेणमध्ये रिक्षाचालकांनी आतापर्यंत रिक्षा चालकांनी मीटरचे रिकॅलिब्रेशन केलेले नाही. तर कल्याण आरटीओमध्ये मीटर कॅलिब्रेशन केलेल्या रिक्षांची संख्या 12 आहे. याउलट ठाणे आरटीओमध्ये रिक्षाचालकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून 3 हजार 355 रिक्षाचालकांनी कॅलिब्रेशन प्रक्रिया पार पडलेली आहे. पनवेल आरटीओ कार्यक्षेत्रात 255 रिक्षाचालकांनी कॅलिब्रेशन केले आहे.
प्रवासी दुरावण्याची भीती