मुंबई : मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात एका विदेशी महिलेसमोर हस्तमैथुन करणाऱ्या कार चालकाची जामिनावर मुक्तता ( Masturbation car driver escape ) करण्यात आली आहे. अंधेरी परिसरात अमेरिकन महिलेसमोर हस्तमैथुन करणाऱ्या टॅक्सी चालकास डी एन नगर पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. पिडित महिलेने एक खाजगी टॅक्सी बुक केली होती. मुंबईतील अंधेरी परिसरात अमेरिकन महिला आपल्या इतर दोन मैत्रिणींसह अलिबाग येथून आली होती.
१५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता -याप्रकरणी योगेंद्र उपाध्याय या टॅक्सी चालकाला अटक करण्यात आली. नंतर त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आता सोमवारी त्याची १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आली असल्याची माहिती डी एन नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद कुर्डे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
महिलेसमोर हस्तमैथून करण्यास सुरवात -ही घटना गेल्या शनिवारी अंधेरी (पश्चिम) परिसरात उघडकीस आली होती. 40 वर्षीय अमेरिकन व्यावसायिक महिला कामानिमित्त एक महिन्यापूर्वी भारतात आली होती. ही महिला आपल्या सहकाऱ्यांसोबत काही कामानिमित्त मुंबईबाहेर गेली होती. शनिवारी पीडितेसह तीचे सहकारी काम संपवून खासगी कॅबमधून मुंबईला परतत होते. त्यावेळी अमेरिकन महिला पुढच्या सीटवर बसली होती. तेव्हा चालकाने महिलेसमोर हस्तमैथून करण्यास सुरवात केली. या प्रकारामुळे महिला चांगलीच गोंधळात पडली होती.
टॅक्सी चालकास अटक, जामिनावर मुक्तता : या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी टॅक्सी चालक योगेंद्र उपाध्याय याला अटक केली होती. पोलिसांनी टॅक्सी चालका विरोधात भादवी कलम 354, 509 नुसार गुन्हा दाखल केला होता. आरोपीला न्यायालयात उभे केले असता त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुणावण्यात आली होती. न्यायालयाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आरोपीची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. आरोपी हा मूळचा मध्य प्रदेशचा असून तो मुंबईचा रहिवासी आहे.