मुंबई -अरबी समुद्रात उठलेले तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकणपट्टीतील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. तसेच अनेक ठिकाणी वीज खंडित झाल्याने सुरू असलेल्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षापासून अनेक विद्यार्थी वंचित राहिले आहे. मात्र, त्या विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, लवकरच परीक्षा घेतली जाईल अशी माहिती, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा विद्यार्थ्यांना फटका; ऑनलाईन परीक्षापासून अनेक विद्यार्थ्यां वंचित - ऑनलाईन परीक्षापासून अनेक विद्यार्थ्यां वंचित
कोकणासह राज्याच्या काही भागात तौक्ते चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात बहुतेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी वीज खंडित झाली. वीज खंडित झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षांमध्ये बसता आलेले नाही. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, विद्यार्थ्यांचा हा गोंधळ स्वतः उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून दूर केला आहे.
ऑनलाईन परीक्षापासून अनेक विद्यार्थ्यां वंचित
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३ अकृषी विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा राज्यभर सुरू आहे. मात्र, अरबी समुद्रात उठलेले तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकणपट्टीतील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. कोकणासह राज्याच्या काही भागात तौक्ते चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात बहुतेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी वीज खंडित झाली. वीज खंडित झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षांमध्ये बसता आलेले नाही. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, विद्यार्थ्यांचा हा गोंधळ स्वतः उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून दूर केला आहे.
'काळजी करू नका'
तौक्ते चक्रीवादळाच्या आपत्तीमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या राहिलेल्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करेल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.