महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा रेल्वेला फटका, लाखो रुपयांचे नुकसान

तौत्के चक्रीवादळाचा फटका मुंबईच्या उपनगरीय लोकल सेवेला बसला आहे. रेल्वे रुळावर आणि लोकलवर वेगवेगळ्या ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या दुर्घटनेमुळे रेल्वेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

Local railway stopped due to tauktae Mumbai
लोकल वाहतूक ठप्प तौक्ती मुंबई

By

Published : May 18, 2021, 3:13 PM IST

मुंबई - तौत्के चक्रीवादळाचा फटका मुंबईच्या उपनगरीय लोकल सेवेला बसला आहे. रेल्वे रुळावर आणि लोकलवर वेगवेगळ्या ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या दुर्घटनेमुळे रेल्वेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा -'देव तारी त्याला कोण मारी'; महिला सुदैवाने थोडक्यात बचावली

रेल्वेत दुर्घटनेची मालिका

कोकण किनाऱ्यावर घोंघावणाऱ्या तौत्के चक्रीवादळाने सोमवारी मुंबईलाही तडाखा दिला. या चक्रीवादळाच्या प्रभावाने मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्याचबरोबर, झाडे उन्मळून पडल्याने रस्त्यावरील आणि रेल्वे मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली. मध्य रेल्वे मार्गावरील शिवडी-कॉटनग्रीन,घाटकोपर, डोंबिवली येथे झाडे पडण्याच्या घटना घडल्या. चुनाभट्टी-जीटीबी नगर येथे ओएचईमध्ये तांत्रिक बिघाड झाला. मस्जिद येथे पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. तर, पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पत्रे कोसळण्याचा घटना घडल्या. इतकेच नव्हे तर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील छत उडाल्याची घटनाही घडली. मात्र, या घटनेत कसल्याही प्रकाराची जीवितहानी झालेली नाही.

लाखो रुपयांचे नुकसान

तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या अभियांत्रिक पथकासह सर्वच यंत्रणा सतर्क होत्या. मात्र, चक्रीवादळाचा तडाखा एवढा मोठ्या प्रमाणात होता की रेल्वेला या दुर्घटना थांबवणे शक्य नव्हते. मात्र, रेल्वेच्या सतर्कतेमुळे या दुर्घटनेत कसल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. तसेच, रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून झाडांच्या फांद्या दूर केल्या. मात्र, कालच्या दुर्घटनेमुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील 16 लोकल रद्द आणि 50 लोकल फेऱ्या उशिराने धावत होत्या. त्यामुळे, सुद्धा रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.

बेस्टच्या 109 बसेसचे नुकसान

वादळासह पावसामुळे दादर, सायन, हिंदमाता, परळ, किंग्ज सर्कल, माटुंगा, चेंबूर आदी सखल भागात पाणी तुंबले. परिणामी, बेस्टच्या बसेसची वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली. रस्त्यात पाणी साचल्याने अनेक बेस्ट उपक्रमाच्या 109 बस गाड्यांमध्ये बिघाड झाला होता. त्यापैकी 60 बस गाड्या दुरुस्त केल्या असून 49 बसगाड्यांच्या दुरुस्तीचे काम रात्रीपर्यंत सुरू होते. तर, काही बसेसवर झाडांच्या फांद्या पडल्याने बेस्टचे नुकसान झाले आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.

हेही वाचा -'खतांच्या किंमतीतून किसान सन्मानची वसुली सुरू'

ABOUT THE AUTHOR

...view details