मुंबई-नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या विरोधात टाटा सामाजिक विज्ञान केंद्र देवनार येथील विद्यार्थ्यांनी देवनार ते चेंबूर आंबेडकर गार्डन असा मोर्चा काढला. त्यानंतर मोर्चेकरी विद्यार्थ्यांनी आंबेडकर गार्डन जवळ ठिय्या मांडत आंदोलन केले.
मुंबई: टाटा सामाजिक विज्ञान केंद्राचे नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या विरोधात ठिय्या आंदोलन
केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहातून मंजूर करून घेतले. त्यांनतर राष्ट्रपतीच्या सहीने त्याचे कायद्यात रूपांतर झाले. मात्र, काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांनी या कायद्याला विरोध केला आहे. त्यासाठी देशभरात विविध प्रदर्शने केली जात आहेत.
हेही वाचा-मैत्रिणीने बोलावले असल्याचा बहाणा करत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहातून मंजूर करून घेतले. त्यांनतर राष्ट्रपतीच्या सहीने त्याचे कायद्यात रूपांतर झाले. मात्र, काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांनी या कायद्याला विरोध केला आहे. त्यासाठी देशभरात विविध प्रदर्शने केली जात आहेत. दरम्यान, काल दिल्लीत जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी निषेध मोर्चा काढला होता. त्याला हिंसक वळण आले. पोलिसांनी बळाचा वापर केला. यात काही विद्यार्थी जखमी झाले. याच्या निषेधार्थ देवनार येथील टाटा सामाजिक संस्थेतील विद्यार्थ्यांनी देवनार ते चेंबूर आंबेडकर पुतळा, असा मोर्चा काढला. त्यानंतर मोर्चेकरी चेंबूरच्या आंबेडकर पुतळ्याजवळ आल्यानंतर त्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
TAGGED:
CAB bill news mumbai