मुंबई - मुंबईमध्ये आज (रविवारी) सर्वात मोठी टाटा मुंबई मॅरेथॉन होत आहे. यातील हाफ मॅरेथॉनचे निकाल समोर आले असून, पुरुष गटात तिर्था पून याने प्रथम क्रमांक पटकवला आहे. तर द्वितीय व तृतीय क्रमांकावर मानसिंग आणि बल्लिप्पा बाजी मारली आहे. ही स्पर्धा 15 किमी अंतराची होती. स्पर्धेतील विजेते हे शासकीय सेवेत रूजू आहेत.
हेही वाचा -मुंबई मॅरेथॉनला सुरुवात, हौशी धावपटूंचा मोठ्या प्रमाणात सहभाग
लहानग्यांपासून वयोवृद्ध नागरिकांचा मोठा सहभाग -
मॅरेथॉनमध्ये लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. प्रत्येक जण काही ना काही सामाजिक संदेश देत या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवत आहे. टाटा मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांशी आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी बातचीत केली आहे.
टाटा मुंबई मॅरेथॉन: लहानग्यांपासून वयोवृद्ध नागरिकांचा मोठा सहभाग मुंबई मॅरेथॉनमध्ये सुरतमधील 71 वर्षीय नरेश झालिया हे गृहस्थ सहभागी झाले आहेत. ते गेल्या तीस वर्षापासून अनेक मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात. यापूर्वी टाटा मॅरेथॉनमध्येही त्यांनी अनेक वेळा सहभाग घेतला आहे. हाफ व पूर्ण मॅरेथॉन अशा दोन्ही प्रकारच्या मॅरेथॉनमध्ये त्यांनी गेल्या काही वर्षात सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे कोणतेही व्यसन न करता सुदृढ आयुष्य नियमित व्यायाम करावा असा संदेश देत या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत.
तसेच या मॅरेथॉनमध्ये अंध अपंग असे स्पर्धक देखील सहभागी झालेले आहेत. अंध स्पर्धक असलेले नरेंद्र साळसकर हे देखील गेल्या पाच ते सहा वर्षापासून या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात. सुदृढ आयुष्य जगावं व कोणताही वादविवाद न ठेवता सर्व धर्मीय एकत्र येत या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात, त्यामुळेच आपण या मॅरेथॉनमध्ये आलो असल्याचे त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.