महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नेम चुकला आणि बाण धनुष्यातच घुसला; भातखळकरांची शिवसेनेवर टीका - मुंबई अतुल भातखळकर बातमी

पीएमसी बँक घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी रवींद्र वायकर यांनी केंद्र सरकारला वर्षांपूर्वी पत्र लिहिले होते. परंतु शिवसेना नेत्यांचा नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला, अशी टीका भाजप नेते व प्रवक्ते अतुल भातखलकर यांनी शिवसेनेवर केली आहे.

target-missed-and-arrow-entered-in-bow-said-bhatkhalkar-in-mumbai
नेम चुकला आणि बाण धनुष्यातच घुसला; भातखळकरांची शिवसेनेवर टीका

By

Published : Jan 2, 2021, 7:06 PM IST

मुंबई -भाजपावर शरसंधान केल्याचा आव आणत रवींद्र वायकर यांनी पीएमसी बँक घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारला वर्षांपूर्वी पत्र लिहिले होते. घोटाळ्यात राजकीय नेते असल्याचा त्यांचा कयास अगदी योग्य होता, फक्त शिवसेना नेत्यांचा नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला, अशी टीका भाजप नेते व प्रवक्ते अतुल भातखलकर यांनी शिवसेनेवर केली आहे.

अतुल भातखलकरांची टीका

शिवसेना नेते बरोबर बोलत होते -

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी भाजप आणि शिवसेना यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीकेची चिखलफेक होताना दिसत आहे. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी जनसामान्यांचे फार मोठे नुकसान झाल्याने शिवसेना आणि भाजप नेते यांनी ईडीजवळ याची चौकशी व्हावी, यासाठी पत्रव्यवहार केले. यामध्ये शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनीदेखील याबाबत पत्रव्यवहार करत यात राजकीय मंडळी असल्याच्या म्हटले होत. नुकताच ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला गैरव्यवहार प्रकरणी नोटीस पाठवली. यावर भाजपने निशाणा साधत टीका केली आहे.

5 जानेवारीला राऊत यांच्या पत्नी चौकशी राहणार हजर -

पीएमसी घोटाळ्याची व्याप्ती वाढत गेल्याने ईडीने या घोटाळ्याचा पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू असताना, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्याकडे केलेल्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. प्रवीण राऊत आणि वर्षा राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राऊतांनी षडयंत्र करत ९५ कोटींची फेरफार केली. यात, पीएमसी बँकेकडून एचडीआयएलने घेतलेले कर्ज, ॲडव्हान्सचा स्रोतही बेकायदेशीर होता. प्रवीण राऊत यांना दिलेल्या पेमेंट्सच्या समर्थनार्थ कोणतीही कागदपत्रे किंवा करार मिळून आला नाही. एचडीआयएलकडून पालघर परिसरातील जमीन खरेदी करण्यासाठी हा निधी देण्यात आल्याचे समोर आले. या व्यवहारांबाबत चौकशी करण्यासाठी ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावत २९ डिसेंबर रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र, त्या चौकशीला हजर राहिल्या नाहीत. त्यांनी ५ जानेवारीपर्यंत ईडीकडे वेळ मागितला आहे. त्यानंतर ईडीने त्यांना पुन्हा समन्स बजावत ५ जानेवारीला हजर राहण्यास सांगितले आहे.

हेही वाचा - रत्नागिरी : सेल्फी काढताना हेदवीच्या बामणघळीत पडून जोडप्याचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details