मुंबई -ॲमेझॉन प्राईमची वेब सीरीज तांडवमध्ये हिंदू भावनांना दुखावल्याचा आरोप करत उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भात उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथक तपासासाठी मुंबईत बुधवारी सकाळी दाखल झालेले आहे. तांडव वेब सीरीजचा निर्माता दिग्दर्शक व चित्रपटाशी संबंधित काही कलाकारांची चौकशी यूपी पोलिसांच्या या पथकाकडून केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
वेब सीरिज निर्मात्यांचा माफीनामा
दरम्यान, तांडव वेब सिरीजमध्ये हिंदू धर्माविषयी भावना दुखविण्यात आल्यानंतर यासंदर्भात भाजपा नेते राम कदम यांनी आंदोलनाचा इशारा देत या संदर्भात पोलिसांनी कारवाई करावी म्हणून मागणी केली होती. उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल केल्यानंतर तपासासाठी उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक मुंबईत दाखल होण्याअगोदरच तांडव वेब सीरिज बनविणाऱ्यांकडून यासंदर्भात बिनशर्त माफी मागण्यात आलेली आहे.
प्रसिद्धीपत्रकात काय म्हटलं आहे