महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

IIT TechFest : भुसावळच्या 'तानाजी'ने जिंकले दोन सामने - तानाजी रोबोट

भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधील विद्यार्थ्यांनी 'ब्लँका बोट्स' ही 30 जणांची टीम बनवली. या टीमने रोबोला महाराष्ट्रातील शूर पराक्रमी व्यक्तींची नावे दिली आहेत. या टीमने जुलै 2016 साली 'तानाजी' नावाचा 60 किलो वजनी रोबो तयार केला आहे.

Tanaji
तानाजी

By

Published : Jan 5, 2020, 8:58 AM IST

मुंबई- आयआयटीमध्ये 3 जानेवारीपासून सुरू झालेल्या टेकफेस्टमध्ये महाराष्ट्रातील भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 'तानाजी'ने 2 सामने जिंकले आहेत. यानंतर आता तानाजीचा उपांत्य फेरीत साउथ कोरियाच्या रोबोसोबत सामना होणार आहे.

भुसावळच्या 'तानाजी'ने जिंकले दोन सामने

हेही वाचा - मुंबई आयआयटी टेकफेस्टमध्ये नाशिकची 'एअर टॅक्सी'

भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधील विद्यार्थ्यांनी 'ब्लँका बोट्स' ही 30 जणांची टीम बनवली. या टीमने रोबोला महाराष्ट्रातील शूर पराक्रमी व्यक्तींची नावे दिली आहेत. या टीमने जुलै 2016 साली 'तानाजी' नावाचा 60 किलो वजनी रोबो तयार केला आहे. तानाजी रोबोटने आतापर्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रशिया आणि चीन रोबोवार स्पर्धेत पहिला व दुसरा अनुक्रमे क्रमांक विजय मिळवला आहे. 2017 ला मुंबई आयआयटीच्या टेकफेस्टमध्येही तानाजीने पहिला क्रमांक मिळवला होता.

हेही वाचा - मुंबईकरांना 24 तास पाण्यासाठी आणखी काही वर्षे वाट पाहावी लागणार

आता तानाजी रोबोटमध्ये बदल करण्यात आला आहे. सध्या 700 आरपीएम इतका असलेला वेग वाढवून 900 आरपीएम इतका करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तानाजीच्या हल्ला करण्याच्या शस्त्रांमध्येही बदल तसेच ड्रम स्पिनर हा अधिक कठीण करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे त्याच्या पॉवर क्षमतेमध्येही वाढ करण्यात आली असल्याचे यावेळी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना विद्यार्थी शुभम दुसाने याने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details