महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'संजय राऊतांना आपण काय बोलतोय याचे भान नाही'

पुण्यातील पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात संजय राऊत यांनी उदयनराजेंनी शिवाजी महाराजाचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे, अशी टीका केली होती.

Tamil Sylvan
तमिळ सेल्वन

By

Published : Jan 19, 2020, 5:05 PM IST

मुंबई- शिवसेना खासदार संजय राऊत यांना आपण काय बोलतोय याचे भान नसल्याची टीका, सायन कोळीवाडाचे भाजप आमदार तमिळ सेल्वन यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा विषय काढून त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी मागणी सेल्वन यांनी केली. संजय राऊत यांच्या विरोधात आमदार सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली अँटॉप हिल्ल ते सायन सर्कल असा मोर्चा काढण्यात आला.

तमिळ सेल्वन, भाजप आमदार

हेही वाचा - मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेल्या वृद्धाचा मृत्यू

पुण्यातील पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात संजय राऊत यांनी उदयनराजेंनी शिवाजी महाराजाचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे, अशी टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details