महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबईतील प्लॅब परीक्षा सेंटर उडवून देण्याची तालिबानी दहशतवादी संघटनेची धमकी

नवी मुंबईमधील प्लॅब परीक्षा सेंटर उडवून देण्याची तालिबानी दहशतवादी संघटनेकडून धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. धमकीचा फोन पोलिसांना आल्याचे बोलले जात आहे.

bomb
bomb

By

Published : Aug 12, 2021, 4:18 PM IST

नवी मुंबई -नवी मुंबई शहरात असणारे प्लॅब परीक्षा केंद्र उडवून देण्याची धमकी तालिबान या दहशतवादी संघटनेकडून देण्यात आली आहे, अशी माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्लॅब केंद्रांची नवी मुंबई पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे.

नवी मुंबई शहरात असणारे हे शिव सेंटर मधील प्लॅब परीक्षा केंद्र उडवून देण्याची धमकी तालिबान या दहशतवादी संघटनेने दिली आहे. त्यासंदर्भात निनावी फोन पोलिसांना आला आहे. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी प्लॅब सेंटरची तपासणी केली आहे. मात्र, या तपासणीत पोलिसांना काहीही आढळून आले नाही. त्यामुळे तालिबान या दहशतवादी संघटनेच्या नावाने फेक कॉल करण्यात आला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करत करण्यात आला आहे. मात्र, तरीही वाशी सेक्टर 17 मधील शिव सेंटरमधील या प्लॅब सेंटरमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस सतर्क झाले आहेत.

प्लॅब म्हणजे काय?

  • व्यवसायिक आणि भाषिक मूल्यांकन मंडळ (plab).
  • पीएलएबी परीक्षा ही परदेशी वैद्यकीय पदवीधरांसाठी आयोजित परवाना परीक्षा आहे. ज्यांना यूकेमध्ये वैद्यकीय सराव करण्याची इच्छा आहे. त्यांना ही परीक्षा द्यावी लागते. म्हणजेच प्लॅब परीक्षा दिल्यानंतर युकेमध्ये मेडिकलच्या (वैद्यकीय) शिक्षणासाठी जाता येते. ती परीक्षा नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 मधील शिव सेंटरमधील प्लॅब येथे होते.

हेही वाचा -गोवा : कलंगुट समुद्रकिनारी आढळला तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह

ABOUT THE AUTHOR

...view details