महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

De-Pollution Of Nandgaon : नांदगाव प्रदुषणमुक्तीसाठी तात्काळ उपाययोजना करा पर्यावरण मंत्र्यांचे निर्देश - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

नागपूर जिल्ह्यातील नांदगाव परिसर प्रदुषण मुक्त ( de-pollution of Nandgaon) करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याकरिता तात्काळ उपाययोजना करण्याचे (Take immediate measures) निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी दिले आहेत. तसेच औष्णिक विद्युत केंद्रातील राखेमुळे बाधित झालेल्या जमिनींचा योग्य मोबदला, पात्रतेनुसार रोजगार आणि पूराच्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्यांचे योग्य पुनर्वसन करण्याबाबत लवकरच बैठक घेतली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.

Environment Minister Aditya Thackeray
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

By

Published : Feb 28, 2022, 6:57 PM IST

मुंबई: नागपूर जिल्ह्यातील नांदगाव परिसरात खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख (फ्लाय ॲश) टाकली जात होती. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याची दखल घेऊन ही राख टाकणे बंद करण्याबरोबरच टाकलेली राख तात्काळ उचलण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार येथील राख उचलण्याचे काम सुरू आहे. या राखेमुळे बाधित रहिवाशांच्या समस्यांबाबत मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित केली होती. बैठकीला रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जैस्वाल, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, महाजेनको खंदारे, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता घुगे, राख विसर्जन तलाव बाधितांचे प्रतिनिधी जागेश्वर पुऱ्हे, ‘असर’ संस्थेचे बद्री चॅटर्जी आदी उपस्थित होते.

वाढीव दराने मोबदला मिळणार

नांदगाव परिसरातील बाधितांच्या समस्यांबाबत तसेच इतरही गावांत असे बाधित असतील तर त्यांनाही रोजगार मिळावा, त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे, जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीकडून प्रकल्पग्रस्तांना वाढीव दराने मोबदला मिळावा याबाबत चर्चा करण्यात येईल. नांदगाव येथील बाधित जमिनीवर भविष्यात सोलर पॅनल, हरित उद्यान यासारखे अन्य पर्यावरणपूरक प्रकल्प राबवता येतील का याबाबत अभ्यास करण्याचे निर्देशही ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच यासंदर्भात ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत तसेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासमवेत बैठक आयोजित करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details