मुंबई- मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुंबईत कोव्हिशील्ड व कोव्हॅक्सीन लस दिली जात आहे. मात्र नागरिकांकडून विशिष्ट अशा लसीची मागणी केली जात आहे. या दोन्ही लस देशभरात वापरल्या जात असून त्याचा सारखाच परिणाम आहे. त्यामुळे मुंबईकरांनी लस निवडण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याने संभ्रम न बाळगता लसीकरण केंद्रावर जी लस उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्यावा असे, आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सीन कोणतीही लस घ्या परिणाम सारखाच- मुंबई महापालिका - मुंबई कोरोना लेटेस्ट न्युज
गेल्या दोन महिन्यांत ७ लाख ६८ हजार २६१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. मुंबईत सुरुवातीच्या काळात सीरम इन्स्टिटयुट ऑफ इंडिया या कंपनीची कोव्हिशील्ड लस दिली जात आहे. याच काळात सरकारी रुग्णालय असलेल्या जेजे रुग्णलयात 'भारत बायोटेक’ या कंपनी निर्मित ‘कोव्हॅक्सीन’ ही लस दिली जात होती. १५ मार्चपासून महापालिकेच्या रुग्णालयांमध्येही ‘कोव्हॅक्सीन’ ही लस वापरण्यासाठी भारत सरकारने परवानगी दिली आहे.
![कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सीन कोणतीही लस घ्या परिणाम सारखाच- मुंबई महापालिका मुंबई कोव्हॅक्सीन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11075941-775-11075941-1616156418954.jpg)
पालिका आयुक्तांचे आवाहन
मुंबईत १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन महिन्यात ७ लाख ६८ हजार २६१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. मुंबईत सुरुवातीच्या काळात सिरम इन्स्टिटयुट ऑफ इंडीया या कंपनीची कोव्हिशील्ड लस दिली जात आहे. याच काळात सरकारी रुग्णालय असलेल्या जेजे रुग्णलयात 'भारत बायोटेक’ या कंपनी निर्मित ‘कोव्हॅक्सीन’ ही लस दिली जात होती. १५ मार्चपासून महापालिकेच्या रुग्णालयांमध्येही ‘कोव्हॅक्सीन’ ही लस वापरण्यासाठी भारत सरकारने परवानगी दिली आहे. या व्यतिरिक्त इतर काही वेगळ्या लसी देखील भविष्यात उपलब्ध होणार आहेत. सध्या दोन्ही प्रकारच्या लसी मुंबईसह देशाभरात वापरण्यात येत असून दोन्ही लसी परिणामकारक आहेत. या अनुषंगाने लसीकरण केंद्रावर आपल्याला लस निवडण्याचा पर्याय उपलब्ध नाही. दोन्ही लसींबाबत संभ्रम न बाळगता लसीकरण केंद्रावर जी लस उपलब्ध असेल त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केले आहे.
त्रिसूत्रीचे पालन करा
कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून त्याला रोखण्यासाठी महापालिकेद्वारे व शासनाद्वारे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनावर औषध नसल्याने लस घेणे हा याच उपाययोजनांचा एक भाग आहे. लस घेतलेली असो किंवा अद्याप घ्यावयाची बाकी असो, सर्वच नागरिकांनी कोविड प्रतिबंधासाठी कोरोनाबाबतच्या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यामध्ये दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा उपयोग करणे किंवा वारंवार हात धुणे महत्वाचे असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
नियमांचे पालन करा
कोविड - १९ या संसर्गजन्य आजारावर खात्रीशीर औषध नसल्यामुळे ज्यांना कोविड बाधा झाली आहे. अशा व्यक्ती किंवा त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्ती यांचे विलगीकरण - अलगीकरण करणे देखील गरजेचे आहे. यानिमित्ताने नागरिकांनी कोविड विषयक सर्व नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
७ लाख ६८ हजार लाभार्थ्यांना लस
मुंबईत काल १८ मार्चपर्यंत एकूण ७ लाख ६८ हजार २६१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात ६ लाख ६९ हजार ४५० लाभार्थ्यांना पहिला तर ९८ हजार ८११ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. कालपर्यंत एकूण २ लाख १० हजार ०८१ आरोग्य कर्मचारी, १ लाख ५६ हजार ४९३ फ्रंटलाईन वर्कर, ३ लाख ५१ हजार ७६७ जेष्ठ नागरिक तर ४५ ते ५९ वर्षामधील गंभीर आजार असलेल्या ४९ हजार ९२० लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
हेही वाचा-महाराष्ट्रातील दुसरी लाट पहिल्या कोरोना लाटेपेक्षा भयानक असणार - डॉ.अविनाश भोंडवे