मुंबई:तडीपार आरोपी खैयाम्मोदीन मोईनुद्दीन सय्यद हा धारावी येथे सासू सोबत राहणाऱ्या पत्नी कडे दिलेले चाळीस हजार रुपये घेण्याकरिता आला. त्यावेळी सासु सोबत आरोपीचा वाद झाला हा वाद सुरु असताना त्या ठिकाणी आरोपीच्या पत्नीचा भाऊ त्या ठिकाणी आला असता त्याच्या सोबत देखील त्याचा वाद सुरू झाला त्यावेळी आरोपीने पत्नीच्या भावावर बंदुकीने गोळी मारली मात्र त्याचा नेम हुकला आणि मेव्हण्याला गोळी लागली नाही. आणि तो थोडक्यात बचावला.
Fired On Brother In Law : तडीपार आरोपीचा मेव्हण्यावर गोळीबार - सायन रुग्णालय
सासूसोबत झालेल्या वादातून तडीपार आरोपीने मेव्हण्यावर गोळीबार ( Tadipar accused fired on brother in law ) केला तसेच स्वत:च्याच हातावर गोळी मारून घेतल्याची घटना मंगळवारी धारावी परिसरात (Dharavi campus ) घडली. घटनेची माहिती पोलिस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमी आरोपीला सायन रुग्णालयात (Sion Hospital) दाखल केले आहे.
घटनेच्यावेळी स्थानिकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने जमावावरही बंदुक रोखून धरली त्यानंतर आरोपीने स्वतःवरही गोळी झाडून स्वतःच जखमी झाला. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला सायन रुग्णालयात दाखल केले आहे. धारावी पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीकडे पिस्तूल कुठून आली या संदर्भातील देखील तपास सुरू आहे आरोपीवर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याने त्याला तडीपार करण्यात आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली तसेच या प्रकरणात आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.