मुंबई- क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून टोळक्याने अल्पवयीन मुलावर तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. गोवंडी पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील एका मैदानात ही घटना घडली. याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - मुंबईत पुन्हा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, हिंदी वेब सिरीजमधील अभिनेत्रीसह ४ मॉडेलची सुटका
मारहाणीचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. गोवंडी स्थानकाच्या बाजूला असलेल्या बेस्ट बस मैदानावर काही अल्पवयीन मुले १९ जानेवारीला क्रिकेट खेळत होती. यादरम्यान दुसऱ्या गटातील १० ते १२ मुलांच्या टोळक्याने एका अल्पवयीन मुलावर तलवारीने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या या मुलावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.