महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशाचे पहिले विदेश भवन मुंबईत उभारण्याचे श्रेय स्वराज यांच्याकडे - sushma swaraj passes away

देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाल्यानंतर संपुर्ण भारतातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची कामगिरी सर्वश्रूत होती. मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील २०१७ साली देशातील पहिले विदेश भवन उभारण्याचे श्रेय स्वराज यांच्याकडे जाते.सुषमा स्वराज यांच्या कालखंडात ८० हजार भारतीय नागरिकांची संकटातून सुटका या विदेश भवनामार्फत करण्यात आली.

सुषमा स्वराज विदेश भवनाचे उद्घाटन करताना

By

Published : Aug 7, 2019, 9:01 AM IST

मुंबई - देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाल्यानंतर संपुर्ण भारतातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची कामगिरी सर्वश्रूत होती. देशाची आर्थिक राजधानी मुंबईसाठी दिलेले योगदानही कुणी विसरणार नाही. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील २०१७ साली देशातील पहिले विदेश भवन उभारण्याचे श्रेय स्वराज यांच्याकडे जाते. विदेशात गेलेल्या लोकांना काही अडचणी आल्या तर त्यांचे निरसन येथून केले जाते.

देशाचे पहिले विदेश भवन मुंबईत उभारण्याचे श्रेय स्वराज यांच्याकडे

मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसी येथे एकाच छताखाली सर्व क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय आणि संबंधित विभागांना एकत्र करून देशाचे पहिले विदेश भवन कार्यान्वित करण्याचे काम माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी केले. देशातील पहिले विदेश भवन मुंबईत असल्याने मुंबईला अधिक महत्त्व प्राप्त झाले. मुंबईसाठी सुषमा स्वराज कायम आठवणीत राहतील अशी ही बाब.

देशाच्या विदेशी कार्यक्षमतेत सुधारणा करणे, विविध सेवांचे वितरण आणि नियंत्रण करणे. तसेच परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित चार प्रकारची कार्यालय सुरू करण्यात सुषमा स्वराज यांचे योगदान होते. त्यामध्ये पासपोर्ट ऑफिस, स्थलांतरितांच्या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी प्रोटेक्टर ऑफ इम्मिग्रेशन परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव कार्यालय, आयसीसीआरचे सांस्कृतीक ऑफिस या भवनात कार्यरत करण्यात आले. यामुळे राज्यातील नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाशी किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्याही समस्या असल्यास त्यांचे त्वरित सोडवणे सोपे झाले.

सुषमा स्वराज यांच्या कालखंडात ८० हजार भारतीय नागरिकांची संकटातून सुटका या विदेश भवनामार्फत करण्यात आली. फक्त भारतीयच नव्हे तर ६७ देशांच्या नागरिकांचे प्राण भारत सरकारने वाचवले. मुंबईतील विदेश भवन हे सुषमा स्वराज यांनी मुंबईकरांसाठी दिलेली एक चांगली आठवण आहे. सुषमा स्वराज यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विदेशात अडकलेल्या भारतियांना तसेच शिक्षण, रोजगार या क्षेत्रात विदेशात काही अडचणी आल्या तर त्याचे निरसन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details