मुंबई- स्वच्छ भारत अभियानांतर्गत ९ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात १ कोटी ६९ लाख ९२ हजार शौचायले बांधण्यात आली आहेत. मुंबई वगळता ३३ जिल्ह्यात शंभर टक्के शौचालयांचे बांधकामे झाली आहेत. तर ठाणे जिल्ह्यात ९९ टक्के घरांमध्ये शौचालये बांधल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. मात्र, जिल्हा हागणदारी मुक्त योजनेत शासनाने कोकणाला झुकते माप दिल्याचे दिसून येते.
राज्य हगणदारी मुक्तीच्या दिशेने; १ कोटी शौचालये बांधल्याचा राज्य शासनाचा दावा - swachh bharat abhiyan maharashtra news
शासनाने कोकणाला दिलेले झुकते माप दिले. आमदार, खासदार, पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे आजही अनेक जिल्ह्यात बहुतांश गावकरी उघड्यावर शौचास जात असल्याचे चित्र आहे.
पाच वर्षात १ कोटी ६९ लाख शौचालये बांधली
राज्याची नागरी लोकसंख्या ११ कोटी, २३ लाख, ७४ हजार ३३३ एवढी आहे. ग्रामीण भागातील एकूण कुटुंबांची संख्या सहा कोटी, १५ लाख, ५६ हजार ०७४ तर शहरी भागात ५ कोटी ८ लाख १८ हजार २५९ इतकी कुटुंब संख्या आहे. बहुतांश कुटुंबांना शौचालयाची सुविधा नव्हती. शौचालयाअभावी अनेक कुटुंबांना उघड्यावर शौचास जावे लागत होते. केंद्र सरकारने ही बाब विचारात घेत, २०१२ पासून हागणदारी मुक्त राज्य करण्याचा निर्णय घेतला. शौचालय बांधणीसाठी प्रतिशौचालयास १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. तर २०१४ मध्ये 'स्वच्छ भारत मिशन उपक्रम' हाती घेण्यात आले. उपक्रमांतर्गत राज्यात ३४ राज्य हागणदारी मुक्त करण्यासाठी गेल्या पाच वर्षात १ कोटी ६९ लाख ९२ हजार १९५ शौचालय बांधण्यात आली आहेत. राज्य शासनाच्या पाणी पुरवठा विभागाने यासंदर्भातील माहिती दिली.