मुंबई : दादर परिसरात नेहमी वर्दळ असलेल्या फुल मार्केटमध्ये दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास एक संशयास्पद बॅग आढळून आली. त्यानंतर BDDS (बॉम्ब शोधक आणि नाशक पथक) च्या टीमला पाचारण करण्यात आले. बीडीडीएसच्या पथकाने बॅगची कसून तपासणी केली. तेव्हा ती बॅग संशयास्पद बॉम्ब सारखी वाटत होती. मात्र बागेची तपासणी केल्यानंतर त्यात बॉम्ब सदृश्य काहीही नसल्याचे आढळून आले. या बॅगेत 9 ते 10 किलो गांजा आढळून आला आहे.
बॅगेत 9-10 किलो गांजा :सुमारे तासाभराच्या या तपासणीत संपूर्ण परिसर बंद करण्यात आला होता. नागरिकांना या परिसरातून ये जा करण्यासाठी पोलिसांनी बंदी आणली होती. त्यानंतर बॅग उघडून तपासणी केली असता बॅगेत 9-10 किलो गांजा आढळून आला. आता पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पिशवी तेथेच सोडून गेलेल्या ड्रग्ज तस्कराचा शोध घेत आहेत.