मुंबई: मुंबईतील अतिशय गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात (Dadar railway station) आज सायंकाळी खळबळ माजली होती. रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटरवर दोन बेवारस बॅगा सापडल्या. (Suspicious bag at Dadar railway station). त्यानंतर रेल्वे पोलिस आणि मुंबई पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच बॉम्ब शोधक पथक देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते. मात्र तपासणीनंतर बॅगेत काही संशयास्पद आढळून आले नाही.
Dadar railway station : दादर रेल्वे स्थानकावरील बेवारस बॅगेत काहीच संशयास्पद नाही, चौकशी सुरु - Suspicious bag at Dadar railway station
मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाच्या (Dadar railway station) तिकीट काउंटरवर आज एक संशयास्पद बॅग सापडली होती. (Suspicious bag at Dadar railway station). बॉम्ब शोधक आणि निकामी पथक तपासासाठी घटनास्थळी पोहोचले, मात्र तपासानंतर बॅगेत काही संशयास्पद आढळून आले नाही.
दादर रेल्वे स्थानकावर सापडली संशयास्पद बॅग.. बॉम्बशोधक व निकामी पथक दाखल
संशयिताची चौकशी सुरु : सायंकाळी सहा वाजता तिकीट काउंटरजवळ दोन बेवारस बॅग असल्याची माहिती पोलिसांना फोनवरून प्राप्त झाली होती. याप्रकरणी दादर रेल्वे पोलीस बॅग ठेवणाऱ्या व्यक्तीची चौकशी करत आहेत. ही व्यक्ती दारूच्या नशेत झारखंडहून त्रिवेंद्रमला जात होती. या व्यक्तीने ही बॅग जाणूनबुजून ठेवली की विसरली, याबाबत पोलीस चौकशी सुरू आहे, अशी माहिती दादर रेल्वे पोलिसांनी दिली.
Last Updated : Dec 30, 2022, 10:39 PM IST