महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत 2 लाख रुपयांच्या लाचप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित - लाच

जेजे मार्ग पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष मुरलीधर गायकवाड याला २ लाख रुपयांची लाच मागण्याच्या गुन्ह्याखाली निलंबित करण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

By

Published : Jun 14, 2019, 11:12 AM IST

मुंबई- जेजे मार्ग पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष मुरलीधर गायकवाड याला २ लाख रुपयांची लाच मागण्याच्या गुन्ह्याखाली निलंबित करण्यात आले आहे. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱयांनी यासंदर्भात पडताळणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

जेजे मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तक्रारदार पीडितावर एमपीडीएच्या अंतर्गत कारवाई करण्यात येत होती. या दरम्यान संबंधित व्यक्तीवर एमपीडीएच्या अंतर्गत कारवाई करायची नसल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष मुरलीधर गायकवाड या अधिकाऱ्याने तक्रादाराकडे 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने पीडित तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत विभागाकडे याबद्दल तक्रार दाखल केली होती. पुरावा म्हणून तक्रारदाराने आरोपी पोलीस अधिकारी व तक्रारदार यांच्यामधील मोबाईल संभाषण रेकॉर्ड करून एसीबीकडे दिले होते.

या संदर्भात तडजोड करत तक्रारदारदाराने लाचेची रक्कम देण्याची तयारी दाखवली मात्र, या संदर्भात आरोपी पोलीस अधिकाऱयाला संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम घेण्यास मनाई केली. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात पडताळणी केली. या दरम्यान अधिकाऱ्याची चौकशी करत मोबाईल संभाषण व इतर पुरावे फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. या संदर्भात पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा नोंदवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details