महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Antilia Case : अँटिलिया प्रकरणातील आरोपी सुनील मानेचा दोषमुक्तीसाठी अर्ज - सुनील माने अँटिलिया प्रकरण अपडेट

निलंबित पोलीस अधिकारी सुनील माने यांनी ( Suspended Police Officer Sunil Mane ) मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्रात उल्लेख नसल्याचा दाखला देत UAPA कलमाखालील आरोप रद्द करा करण्यात यावा तसेच आरोपातून दोषमुक्ती करण्यासाठी अर्ज केला आहे. ( Sunil Mane in Antilia Case )

Sunil Mane
सुनील माने

By

Published : Feb 11, 2022, 10:47 PM IST

मुंबई -निलंबित पोलीस अधिकारी सुनील माने यांनी ( Suspended Police Officer Sunil Mane ) मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्रात उल्लेख नसल्याचा दाखला देत UAPA कलमाखालील आरोप रद्द करा करण्यात यावा तसेच आरोपातून दोषमुक्ती करण्यासाठी अर्ज केला आहे. ( Sunil Mane in Antilia Case ) उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर सापडलेले स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील सुनील माने आरोपी आहेत. या अर्जावर सत्र न्यायालयाने उत्तर देण्याचे निर्देश दिले आहे. निलंबित पोलीस अधिकारी सुनील मानेला 23 एप्रिलला एनआयएने अटक केली होती.

एनआयएचा दावा -

सुनील माने हे मुंबईतील कांदिवली क्राइम ब्रँचचे पोलिस निरीक्षक होते. माने यांची दहशतवाद पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये चौकशी करण्यात आली होती. मनसुख हिरन हत्या प्रकरणात अटक झालेले पोलीस निरीक्षक सुनील माने यांना मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणाची पूर्वकल्पना होती, असा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) दावा होता.

ॲंटिलिया स्फोटक प्रकरण उघडकीस आले त्यावेळी सुनिल माने हे गुन्हे शाखा युनिट ८ मध्ये कार्यरत होते. या प्रकरणात त्यांनी वाझेंना मदत केल्याचे समोर येताच त्यांची सशस्त्र विभागात बदली करण्यात आली होती. काही दिवसांनी त्यांचा गुन्ह्यात सहभाग स्पष्ट झाल्यानंतर एनआयएने त्यांना अटक केली. या प्रकरणात अटक झालेल्या सर्व चारही पोलिसांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणाचीही पूर्ण कल्पना होती, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने केला आहे. तर मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील मानेने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याचे अनेक पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत.

हेही वाचा -Kirit Somaiya Exclusive : माझ्यावरचा हल्ला हे उद्धव ठाकरेंचं कारस्थान : किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

नेमकं काय घडलं होतं?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत 25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटकं सापडली होती. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच, संबंधित पथकं घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details