मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या शेतकऱ्याला कर्जमाफी झाली म्हणून प्रमाणपत्र दिले. परंतु, आत्तापर्यंत कर्जमाफी झालीच नाही. यासाठीची सर्व कागदपत्रे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात मांडून सरकारच्या कर्जमाफीचा पर्दाफाश केला. पतंगे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. नंतर या शेतकऱ्याला विधानसभा परिसरात आल्यानंतर पोलिसांनी अटक केली.
‘त्या’ शेतकऱ्याला अटक करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा - सभापती रामराजे नाईक-निंबाळकर - रामराजे नाईक निंबाळकर
पतंगे या शेतकऱ्याने आपल्याला कर्ज मिळालेले नाही म्हणून आपल्याला जगता येत नाही. त्यामुळे आपण आपली किडणी विकण्यास तयार आहोत अशी कैफियत मांडली.
ही बाब विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात उपस्थित करताच या शेतकऱ्याची तत्काळ सुटका करावी आणि ज्या अधिकऱ्यांनी अटक करण्याची कारवाई केली त्याचे निलंबन करावे, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सांगितले की, पतंगे या शेतकऱ्याने आपल्याला कर्ज मिळालेले नाही म्हणून आपल्याला जगता येत नाही. त्यामुळे आपण आपली किडणी विकण्यास तयार आहोत अशी कैफियत मांडली.
अशा प्रकारे एखाद्या शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली म्हणून त्याला जर अटक केली गेली असेल तर त्यांनी कोणता गुन्हा केला ? असा सवाल करत अशा प्रकारे अटक करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. त्यावर सभापतींनी संबंधित अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करण्याचे निर्देश दिले.