महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 19, 2022, 9:41 PM IST

ETV Bharat / state

Measles Disease : मुंबईत गोवरचा उद्रेक; संशयित रुग्णांची संख्या ३०३६ वर, ९ मृत्यू

मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यांत गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत एकूण १८४ रुग्णांची तर ३०३६ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक मृत्यू मुंबई बाहेरील आहे. ७३ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी ९ रुग्ण ऑक्सीजनवर, २ रुग्ण व्हेंटिलेटवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य (Mumbai Municipal Health Department ) विभागाने दिली.

Measles disease
मुंबईत गोवरचा उद्रेक संशयित रुग्णांची संख्या ३०३६ वर, ९ मृत्यू

मुंबई:मुंबईमध्ये (Mumbai Municipal Health Department ) गेल्या दोन महिन्यांत गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत एकूण १८४ रुग्णांची तर ३०३६ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

९ रुग्ण ऑक्सिजनवर, २ व्हेंटिलेटवरमुंबईत २६ लाख २७ हजार ६६७ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ३०३६ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे १८४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७३ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. ६२ रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. ९ रुग्ण ऑक्सिजनवर तर २ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात १५ हजार ००९ मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

९ संशयीत मृत्यू -२६ ऑक्टोबर पासून मुंबईत ९ मृत्यू झाले आहेत. त्यामधील एक मृत्यू मुंबई मुंबई बाहेरील (भिवंडी) येथील आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

लसीकरण आणि जनजागृतीवर भरमुंबईत ० ते २ वयोगटातील पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले आहे. यात २० हजार मुलांचे लसीकरण राहिले आहे. काहींनी एकच डोस घेतला आहे. तर काहींनी लसिकरणच केलेले नाही. त्यामुळे अशा २० हजार मुलांवर पालिका लक्ष केंद्रित करणार असून या सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत.

ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी लस घ्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. गोवंडी, चेंबूर, भायखळा, कुर्ला, मालाड, धारावी, सांताक्रूझ, वडाळा या ८ विभागात गोवरचे रुग्ण सर्वाधिक आहेत. यामुळे या विभागात जनजागृती केली जात आहे. धर्म गुरू, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फत लसीकरणबाबत जनजागृती केली जात आहे. गरज पडल्यास बेड आयसीयु आणि व्हेंटिलेटरची संख्या वाढवली जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details