मुंबई - कुलाबा विधानसभा मतदारसंघातील झवेरी बाजार भागात बुधवारी रात्री बाराच्या नाजण्याच्या सुमारास दक्षिण प्रादेशिक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सुहास माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ५ व्यक्तींकडून २ कोटी १९ लाख ५० हजार रुपये इतकी संशयास्पद रक्कम जप्त केली.
कुलाबा विधानसभा मतदारसंघातील जव्हेरी बाजारातून २ कोटी १९ लाखाची संशयास्पद रक्कम जप्त
कुलाबा विधानसभा मतदारसंघातील झवेरी बाजार भागात बुधवारी रात्री बाराच्या वाजण्याच्या सुमारास दक्षिण प्रादेशिक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सुहास माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ५ व्यक्तींकडून २ कोटी १९ लाख ५० हजार रुपये इतकी संशयित रक्कम जप्त केली.
हेही वाचा -निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोहफुलची २६९ लिटर दारू जप्त
मोक्ष दुग्धालय पहिली अग्यारी लेन खारा कुआ झवेरी बाजार येथे सागर रमेश आजगावकर ६० लाख रुपये, रमेश अशोक जैन ४० लाख, जेटू लक्ष्मण सिंग ३० लाख रु, इम्रान सय्यद कादरी ३९ लाख ५० हजार, विठ्ठल काशीनाथ यादव आणि संजय मळेकर यांचेकडून ५० लाख रुपये अशी एकुण २ कोटी १९ लाख ५० हजारांची रक्कम जप्त केली आहे. आयकर विभाग मुंबईचे निरीक्षक रितेश कुमार आणि दिलीप मदन हे आयकर संदर्भात पुढील तपास करीत आहेत. लोकमान्य टिळक मार्ग पोलीस स्टेशन येथे याची नोंद करण्यात आली आहे.