मुंबई - ईशान्य मुंबईत भारतीय जनाधिकार पार्टीच्या वतीने सुषमा मौर्य या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. निवडणुकीच्या काळात सुषमा मौर्य यांनी मतदारसंघात रिक्षाने प्रचार करीत आपली मतदार संघात ओळख निर्माण केली होती. मोर्य यांनी ईशान्य मुंबईतून १७ व्या लोकसभा निवडणुकीत सर्वप्रथम निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
ईशान्य मुंबई : भारतीय जनाधिकार पार्टीच्या उमेदवार मौर्यंच्या प्रचारार्थ रिक्षा रॅली - loksabha
भारतीय जनाधिकार पार्टीचे संस्थापक हे बाबू सिंह कुशवाह आहेत. सुषमा मौर्य यांनी भारतीय जनाधिकार पार्टी काढून आपली उमेदवारी अर्ज दाखल केला.
भारतीय जनाधिकार पार्टीचे संस्थापक हे बाबू सिंह कुशवाह आहेत. सुषमा मौर्य यांनी भारतीय जनाधिकार पार्टी काढून आपली उमेदवारी अर्ज दाखल केला आणि प्रचाराच्या मार्गातून मतदारांना आपली ओळख एक स्त्री सामान्य माणसाला विकास आणि न्याय देण्यासाठी निवडणूक लढवत आहे. अशा प्रकारे भ्रमणध्वनीवरून त्या प्रचार करीत होत्या. आज निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सुषमा मौर्य यांनी मुलुंड ते मानखुर्द या भागात रिक्षा रॅली काढून प्रचार केला. आणि सर्वांनी आवश्य मतदान केले पाहिजे, अशा प्रकारे भ्रमणध्वनीवरून आवाहन करीत होत्या.