महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sushma Andhare: अंधारे सुपारी घेऊन काम करतात; शिंदे गटाच्या उपनेत्याचा गंभीर आरोप - Sushma Andhare Controversial statement

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू, साधू, संताबाबत वादग्रस्त विधान करुन प्रसिध्दीसाठी अंधारे वाटेल ते बोलत आहेत. (Sushma Andhare) त्या सुपारी घेऊन काम करतात, असा गंभीर आरोप शिंदे गटाच्या उपनेत्या आशा मामेडी यांनी केला. तसेच अंधारेंना रामायण आणि महाभारत ग्रंथ भेट देणार असल्याचे मामेडी म्हणाले. दरम्यान, वारकरी सांप्रदायाने अंधारेंविरोधात उद्या मोर्चाची हाक दिली आहे. 36 जिल्ह्यात हा मोर्चा निघेल.

शिंदे गटाच्या उपनेत्या आशा मामेडी
शिंदे गटाच्या उपनेत्या आशा मामेडी

By

Published : Dec 15, 2022, 9:50 PM IST

पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे गटाच्या उपनेत्या आशा मामेडी

मुंबई -शिवसेना ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे या शिवसेना ठाकरे गट प्रवेशाच्या आधी हिंदू धर्म, संत परंपरेवर केलेल्या टीकेवरून अडचणीत सापडल्या आहेत. वारकऱ्यांकडून सुषमा अंधारे यांना ठाकरे गटाच्या पक्षातून काढून टाका, अशी मागणी केली जात आहे. वारकऱ्यांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शिंदे गटाच्या उपनेत्या आशा मामेडी यांनी जोरदार टीका केली. (Sushma Andhare Controversial statement) हिंद देवदेवतांवर टीका करण्याची अंधारे यांची पात्रता नाही. सर्वच स्तरातून अंधारेंवर टीकेची झोड उठली आहे. त्या महिला नाहीत. केवळ प्रसिद्धीसाठी कुणावरही त्या काहीही बोलत आहेत. सुपारी घेऊन अंधारे काम करत आहेत, असा आरोप मामेडी यांनी केला. तसेच, उद्धव ठाकरेंनी उजेड बाजूला करुन अंधार जवळ केल्याचेही मामेडी म्हणाल्या आहेत.

पक्ष संपवायला निघाल्या - धारेंना हिंदु देवतांचे आदरस्थान असलेले रामायण आणि महाभारत ग्रंथ लवकरच त्यांना भेट देणार आहोत. त्यानंतर ही वादग्रस्त वक्तव्य केल्यास, चोप देऊ आणि महाराष्ट्रात त्यांना फिरू देणार नाही, असा इशारा दिला. अंधारे या वाघीण समजत असल्या तरी त्या माकडीण, राक्षस आहेत, अशा शब्दांत खदखद व्यक्त केली. यावेळी सुषमा अंधारे यांची तुलना डुक्करी सोबत करण्यास त्या विसरल्या नाहीत. ठाकरे गटात असलेल्या गटबाजीचा फायदा घेऊन पक्ष संपवायला निघाल्याचे मामेडी म्हणाल्या.

ठाकरेंनी देखील माफी मागावी - सुषमा अंधारे या जबाबदार पक्षाच्या उपनेत्या असून त्यांनी हिंदूंवर वारंवार आक्षेपार्ह टीका करत आहेत. स्वतःचे ठेवायचे झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून, अशी अंधारे यांची तऱ्हा आहे. मूळात त्यांच्या घराचा घोळ, नावाचा घोळ आहे. त्यांनी इतरांवर टीका करु नये. अंधारे यांच्या खासगी आयुष्यातचही अनेक घोळ आहे. साधू, संत, हिंदू देव देवतांवर अशा पद्धतीने टीका करु नये. अंधारेंकडून हिंदू धर्माला बट्टा लावण्याचे काम सुरु आहे. त्यांनी माफी मागावी, त्याबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी देखील माफी मागावी, असे शिंदे गटाचे समन्वयक वैजनाथ वाघमारे यांनी सांगितले आहे.

राज्यभरात उद्या आंदोलन -पंधरा हजार युवा वारकऱ्यांची आमची संघटना आहे. अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. वारकरी संप्रदायाबाबत ज्यांना काही माहित नाही, त्यांनी विनाकारण अकलेचे तारे तोडू नयेत. आम्ही त्याच्यासारखी चिखलफेक करणार नाही, कारण आमची ती संस्कृती नाही. अंधारे वारंवार बाबासाहेब आंबेडकर, सविधानाचे दाखले देतात. त्याचच बाबासाहेबांच्या दोन्ही मुखपत्रातून अभंग व ओव्या छापल्या जात होत्या. अंधारेच्या विधानावर वारकरी सांप्रदाय नाराज असून त्यांच्यावर बहिष्कार टाकत आहोत. त्यांनी माफी जरी मागितली असली तरी उद्या राज्यभरात आंदोलन करणार आहोत. आमचे आंदोलन शांततेत, हातात व भगवा झेंडा, टाळ मृदुंग घेऊन एकूणचे दिंडी स्वरुपाचे असेल, युवा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details