महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mahaprabodhan Yatra : महापुरुषांचा अवमान करणे हे ठरवून केलेले षडयंत्र, सुषमा अंधारे यांची भाजपवर टीका - महापुरुषांचा अवमान ठरवून केलेले षडयंत्र

पक्ष नेतृत्व किंवा मोदींबाबत विधाने केल्यानंतर आगपाखड करणारे भाजप नेते महापुरुषांवर होणाऱ्या वक्त्यांबाबत मात्र मौन (Sushma Andhare criticized Devendra Fadnavis) पाळतात. हा निव्वळ योगायोग नाही, हे ठरवून महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडविण्याचे, महापुरुषांचा अवमान करण्याचे ठरवून केलेले षडयंत्र आहे. असा गंभीर आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी (Sushma Andhare criticized in mahaprabodhan yatra) केला.

Sushma Andhare
सुषमा अंधारे

By

Published : Dec 2, 2022, 10:00 AM IST

मुंबई : पक्ष नेतृत्व किंवा मोदींबाबत विधाने केल्यानंतर आगपाखड करणारे भाजप नेते महापुरुषांवर होणाऱ्या वक्त्यांबाबत मात्र मौन पाळतात. हा निव्वळ योगायोग नाही, हे ठरवून महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडविण्याचे, महापुरुषांचा अवमान करणे हे ठरवून केलेले षडयंत्र (Sushma Andhare criticized Devendra Fadnavis) आहे. हा प्रकार देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. राज ठाकरे (Raj Thackeray), देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, किरीट सोमय्या यांच्यासह शिंदे गटाच्या नेत्यांचाही खरपूस समाचार घेतला. चौफेर टोलेबाजी करत महाप्रबोधन यात्रेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. मुलुंड येथील महाप्रबोधन यात्रेत त्या बोलत (Sushma Andhare criticized in mahaprabodhan yatra) होत्या.

वादग्रस्त विधाने :राज्यपाल यांच्यासहित, शिंदे गटाकडून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधाने केली जात आहेत. यावर कोणतेही बंधन नाही. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असूनही महापुरुषांबाबत होणारे वादग्रस्त विधानांप्रकरणी भाजप नेत्यांवर कारवाई करत नाहीत. आज महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडविणारी वक्तव्ये येत आहेत. निव्वळ योगायोग नाही हे ठरवून महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडविण्याचा, इथल्या महापुरुषांचा अवमान करणे हे ठरवून केलेले षडयंत्र आहे. हा प्रकार देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली सुरू आहे. एकीकडे मोदींना रावण म्हटल्यानंतर तत्परतेने व्यक्त होणारे देवेंद्रजी आहेत. मात्र इथल्या महापुरुषांचा अपमान होतो, तेव्हा अळीमिळी चुपचिली करून बसतात. हा याचा ढळढळीत पुरावा आहे, असे अंधारे (Sushma Andhare criticized) म्हणाल्या.

उथळ वक्तव्ये :गुलाबराव पाटील रेडा म्हणतात, सदाभाऊ खोत रेड्यांच्या अवलादी म्हणतात. ही जी काही वक्तव्ये आहेत. ही उथळ वक्तव्ये आहेत, महाराष्ट्राच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारी आहेत, असे मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले. राज ठाकरे हे फॅमिलीच्या विरोधातच ऍक्टिव्ह होत असतात. राज ठाकरे कधी भाजपच्या विरोधात ऍक्टिव्ह होत नाहीत, असा चिमटा काढला.



तर राजीनामा द्यावा :नागपूरमध्ये एका लहान मुलीचे तुकडे तुकडे करून हत्या करण्यात आली आहे, तिकडे जात आहे. महिलांसंदर्भात काही घटना समोर येऊनही गृहमंत्री देवेंद्रजी अपयशी ठरले आहेत. एकाच सहा पदे ठेवून गंभीर मुद्द्यांकडे दुर्लक्ष होत असेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. तसेच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरही अंगारे आणि निशाणा साधला. किरीट सोमय्या, नारायण राणे हे देखील अंधारे यांच्या निशाण्यावर होते. दरम्यान, जुन्या भाषणाच्या क्लिप दाखवत, यात्रेत रंगत (mahaprabodhan yatra) आणली.

ABOUT THE AUTHOR

...view details