महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया शाहची ईडीकडून सहा तास चौकशी - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण

10 कोटी रुपये कमिशनच्या स्वरूपात मिळाले, याचा पुरावा ईडीकडून मागण्यात आल्यानंतर याबाबत जया शहा नीट उत्तर देऊ शकली नसल्याचे समोर येत आहे.

Sushantsingh rajput
सुशांतसिंह राजपूत

By

Published : Aug 28, 2020, 10:59 AM IST

मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सीबीआयकडून तपास सुरू आहे. सोबतच सुशांतसिंहच्या आर्थिक व्यवहाराबाबतही ईडीकडून तपास केला जात आहे. या संदर्भात ईडीकडून तब्बल सहा तास जया शहा या सुशांतच्या टॅलेंट मॅनेजरची चौकशी करण्यात आलेली आहे. सुशांतसिंहच्या खात्यातून तब्बल 10 कोटी रुपये टप्प्या-टप्प्याने जया शहाच्या खात्यात वळवले असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ईडीकडून याबाबत जया शहाला काही प्रश्न विचारण्यात आले होते.

जया शहाने ईडीला दिलेल्या उत्तरात म्हटलंय की 'गेले वर्षभर मी सुशांतसिंहची टॅलेंट मॅनेजर म्हणून काम पाहत होती. सुशांतसिंहला जाहिराती व चित्रपट मिळवून देण्याचे काम या वर्षभरात मी पाहिले. या कामाच्या मोबदल्यात प्रत्येक वेळेस कमिशनपोटी सुशांतसिंहकडून मला पैसे मिळत होते.' मात्र, 10 कोटी रुपये कमिशनच्या स्वरूपात मिळाले, याचा पुरावा ईडीकडून मागण्यात आल्यानंतर याबाबत जया शहा नीट उत्तर देऊ शकली नसल्याचे समोर येत आहे. ईडीकडून जया शहाला विचारण्यात आले की सुशांतसिंहला वर्षभरात किती कोटी रुपयांची काम मिळवून दिली होती ? यात कुठल्या जाहिराती व कुठे चित्रपट होते? हे प्रश्न विचारले. मात्र, जया याबद्दल नीट उत्तरे देऊ शकलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details