मुंबई - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाला आता नवीन वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : सीबीआयकडून 'या' संशयित आरोपींवर गुन्हा दाखल - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाला आता नवीन वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्याप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : सीबीआयकडून 'या' संशयित आरोपींवर गुन्हा दाखल Sushant Singh suicide case: CBI files case](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8322097-818-8322097-1596726106138.jpg)
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण
सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांच्या संशयित आरोपींच्या यादीत रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी यांच्यासह एका अज्ञात व्यक्तीचे नाव आहे. कलम 120 बी, 306, 341, 342, 380, 406, 420, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटणाच्या राजीवनगर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.