मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर यासंदर्भात सुशांत सिंहचे वडील के.के. सिंह यांनी बिहार पोलिसांकडे त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर या संदर्भात बिहार पोलिसांचे चार जणांचे पथक मुंबईत येऊन चौकशी करत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत सिंह राजपूत याने सप्टेंबर, 2019 मध्ये रिहॅलिटीक्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली होती. ही कंपनी सुरू करण्यासाठी रिया चक्रवर्ती व सुशांत सिंह राजपूत या दोघांमध्ये बरेच महिने बोलणी सुरू होती.
सुशांत सिंहच्या दोन कंपनीचा पत्ता नवी मुंबईतील घराचा, घर रिया चक्रवर्तीच्या वडिलांच्या नावावर - रिया चक्रवर्ती बातमी
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने सुरू केलेल्या दोन कंपन्यांच्या नोंदीवर नवी मुंबईतील एका घराचा पत्ता आहे. हे घर रिया चक्रवर्ती यांच्या वडिलांच्या नावावर आहे, अशी माहिती विश्वसनीय सुत्राने दिली आहे.
दरम्यान, रिया चक्रवर्ती हिने तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती याला कंपनी डायरेक्टर बनवण्यासाठी सुशांत सिंह याला मनवले होते. ही कंपनी स्थापित केल्यानंतर एक-दोन महिन्यातच सुशांत सिंग हा डिप्रेशनमध्ये गेला असल्याचे सूत्रांकडून कळते आहे. त्यामुळे सुशांत सिंह हा मुंबईच्या चार वेगवेगळ्या डॉक्टरांकडे उपचार सुद्धा घेत होता. जानेवारी, 2020 मध्ये सुशांत सिंह याच्यावर उपचार सुरू असताना या दरम्यानच रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक याने सुशांत सिंह याच्यासोबत मिळून फ्रंट इंडिया फॉरवर्ड फाउंडेशन नावाची कंपनी सुद्धा स्थापन केली होती. सुशांत सिंग, रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोवीक चक्रवर्ती यांनी स्थापीत केलेल्या दोन कंपन्यांच्या कार्यालयाचा पत्ता हा नवी मुंबईमधील एका फ्लॅटवर देण्यात आलेला आहे. हा फ्लॅट रिया चक्रवर्ती हिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांच्या नावावर असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. सुशांत सिंहने आत्महत्या करण्यापूर्वीच काही महिन्याआधी रिया चक्रवर्ती हिने व्हिव्हिडरेज रिहॅलिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालक पदावरचे आपले नाव काढून घेतले होते.
दरम्यान, बिहारवरून आलेल्या पोलिसांच्या पथकाला मुंबई पोलिसांनी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात यात कुठलाही पुरावा कागदोपत्री स्वरूपात देण्यात मुंबई पोलिसांनी नकार दिल्याचे सूत्रांकडून कळत आहे. यासाठी बिहार पोलिसांना नोडल ऑफिसर पोलीस उपायुक्त क्राईम ब्रँचच्या अधिकार्यांनी भेटण्यासाठी सांगण्यात आलेला आहे.