मुंबई -अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची सीबीआयने चौकशी सुरू केल्यापासून या प्रकरणात नवनवीन मुद्दे समोर येत आहेत. सुशांतसिंह प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या चौकशीत ती ड्रग्स डिलरचा संपर्कात होती, असे समोर आले आहे. यावर भाजपाचे राष्ट्रीय नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी धक्कादायक दावा केला आहे. त्यात आज भाजपा आमदार राम कदम यांनी देखील महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.
आमदार राम कदम म्हणाले की, सुशांतसिंह प्रकरणात आता ड्रग्स आणि ड्रग्स माफिया यांचा विषय उघडकीस आला आहे. प्रश्न आता हा उपस्थित होत आहे की दोन महिन्यापासून हे प्रकरण महाराष्ट्र सरकारकडे आहे. मग तेव्हा या गोष्टी बाहेर का आल्या नाहीत. महाराष्ट्राच्या सरकारला त्या ड्रग्ज माफियांना वाचवायचं होतं का? सीबीआयला देखील तपास देण्यास ते तयार नव्हते. जे संशयित आहेत त्यांची देखील ते चौकशी करण्यास तयार नव्हते.
सुशांतसिंह प्रकरण : महाराष्ट्राच्या सरकारला ड्रग्ज माफियांना व बड्या नेत्यांना वाचवायचं होतं का?; राम कदमांचा सवाल - सुब्रमण्यम स्वामी
आमदार राम कदम म्हणाले की, सुशांतसिंह प्रकरणात आता ड्रग्स आणि ड्रग्स माफिया यांचा विषय उघडकीस आला आहे. प्रश्न आता हा उपस्थित होत आहे की दोन महिन्यापासून हे प्रकरण महाराष्ट्र सरकारकडे आहे. मग तेव्हा या गोष्टी बाहेर का आल्या नाहीत. महाराष्ट्राच्या सरकारला त्या ड्रग्ज माफियांना वाचवायचं होतं का? सीबीआयला देखील तपास देण्यास ते तयार नव्हते. जे संशयित आहेत त्यांची देखील ते चौकशी करण्यास तयार नव्हते.
![सुशांतसिंह प्रकरण : महाराष्ट्राच्या सरकारला ड्रग्ज माफियांना व बड्या नेत्यांना वाचवायचं होतं का?; राम कदमांचा सवाल bjp mla ram kadam on sushant singh rajput suicide case](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8565786-975-8565786-1598441736603.jpg)
सुशांतसिंह प्रकरण : महाराष्ट्राच्या सरकारला ड्रग्ज माफियांना व बड्या नेत्यांना वाचवायचं होतं का?; राम कदमांचा सवाल
आमदार राम कदम बोलताना...