मुंबई -सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एनसीबीकडून रिया चक्रवर्ती हिची चौकशी झाली. यात ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडमधील काही व्यक्तींची नावं समोर आल्याचे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमधील सूत्रांचे म्हणणे आहे. याबरोबरच या व्यक्तींना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशीसाठी लवकरच समन्स बजावले जाणार आहे. यामध्ये काही ड्रग्स पेडलर असल्याचे समजते. दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून मुंबई व मुंबई बाहेर छापेमारी करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा एनसीबी कार्यालय येथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.
रियाच्या चौकशीत बॉलिवूडमधील काही व्यक्तींची नाव उघड; लवकरच होणार चौकशी - रिया चक्रवर्ती न्यूज
एनसीबीकडून रिया चक्रवर्ती हिची चौकशी केली असता, रिया चक्रवर्तीचा चौकशीत बॉलिवूडमधील काही व्यक्तींची नावं समोर आल्याचे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमधील सूत्रांचे म्हणणे आहे.
रियाच्या चौकशीत बॉलिवूडमधील काही व्यक्तींची नाव उघड; लवकरच होणार चौकशी