मुंबई- सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीविरोधात बिहार पोलिसांनी गुन्हा नोंदविल्यानंतर या संदर्भात सुशांत सिंगचे वडील के. के सिंग व सुशांतसिंगच्या बहिणीने दिलेल्या जबाबत बऱ्याच गोष्टी आता समोर येत आहेत. पोलिसांनी सुशांतसिंग राजपूतची बहीण मितु सिंगचा जवाब नोंदविला असून तिने ९ जून ते १२ जून पर्यंतचा घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला आहे. याबाबत पाहुयात इटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट..
'सुशांतसिंगच्या बहिणीने काय म्हटले जबाबात'-
मितु सिंग यांनी बिहार पोलिसांना माहिती दिली की, सुशांतच्या आत्महत्या करण्याआधी ८ जूनला रिया चक्रवर्ती व सुशांत सिंगमध्ये मोठे भांडण झाले होते. ज्याची माहिती स्वतः रियाने मीतू सिंगला फोन करून दिली होती. यानंतर ९ जूनला मितू सिंग स्वतः सुशांतला भेटायला त्याच्या घरी गेली होती. ती काही दिवस त्याच्या घरी राहिली होती. यादरम्यान, सुशांतने त्याच्या बहिणीला सांगितले की, रियासोबत त्याचे भांडण झाले असून ती त्याचे घर सोडून गेली आहे. कदाचित ती पुन्हा येणार नाही असे सांगून गेली आहे. यावेळी मी सुशांतला समजविण्याचा प्रयत्न केला होता व त्याच्या घरी चार दिवस राहिली होती, असे मितू सिंगने तिच्या जबाबात म्हटले आहे. मला स्वप्नातही वाटले नव्हते की, सुशांत आत्महत्यासारखे पाऊल उचलेल. यानंतर मी माझ्या घरी निघून गेले होते. मात्र १४ जूनला मला सिद्धार्थ पठाणीचा फोन आला होता, तेव्हा मला कळाले की, सुशांत बऱ्याच वेळा पासून त्याचा बेडरूमचा दरवाजा उघडत नाही. मी तात्काळ सुशांतच्या घरी जाण्यास निघाले. यादरम्यान मी सुशांतच्या मोबाईलवर सतत फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र काही एक फायदा झाला नाही. घरी आल्यावर आम्ही चावी बनविणाऱ्या व्यक्तीकडून सुशांतच्या रुमचा दरवाजा उघडून घेतला. मात्र, यावेळी सुशांत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आम्हाला पाहायला मिळाला. मला काय करावे हे कळत नव्हते, दरम्यान मुंबई पोलिसांनी येऊन तपास करण्यास सुरवात केली.
आत्महत्येपूर्वी सुशांत व रियामध्ये झाले होते भांडण; सुशांतच्या बहिणीचा खुलासा आतापर्यंत सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबीयांची चौकशी करण्याआधी बिहार पोलिसांना सुशांत सिंगच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीला पडताळून पाहायचे आहे. याला अनुसरून बिहार पोलिसांनी आतापर्यंत सुशांतची बहीण व त्याचा नोकर या दोघांचे जवाब नोंदविले आहेत. आता बिहार पोलिसांचे एक पथक सुशांत सिंग यांच्या बँक अकाऊंटला बद्दल त्याच्या सीएची चौकशी करीत आहेत. तसेच, पोलीस लवकरच सुशांत सिंगचा स्वयंपाकी आणि सिद्धार्थ पठाणी याची सुद्धा चौकशी करणार आहेत. तसेच सुशांतवर उपचार करणारे ३ मनोचिकित्सक व १ मानसशास्त्रज्ञ यांचे सुद्धा जवाब नोंदवणार आहेत.
बिहार पोलीस यासंदर्भात रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोईक चक्रवर्ती या दोघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. हे दोघेही त्यांच्या जुहू स्थित घरातला नसल्याची माहीती समोर येत आहे. या सगळ्यात विशेष बाब म्हणजे, सुशांतसिंगच्या २ कंपनीचा व्यवहार सांभाळणाऱ्या श्रुती मोदीचे नाव पुढे येत आहे. श्रुती मोदी रिया व शोवीक चक्रवर्ती या दोघांची मॅनेजर म्हणून काम पाहत होती. मुंबई पोलिसांनी श्रुती मोदींचा जवाब नोंदविल्यानंतर आता बिहार पोलिसही तिची चौकशी करणार आहेत.