मुंबई:मुंबई मेट्रो रेल्वे हा महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. तर केंद्र शासनाच्या दृष्टीने कुलाबा ते वांद्रे सी मुंबई मेट्रो लाईन 3 हा भारताच्या आर्थिक राजधानी मधील महत्त्वाचा प्रकल्प देखील आहे. शासनाने या संदर्भात दावा केलाय, की जशी मुंबईची लोकल ही जीवन वाहिन्या म्हणून पाहिले जाते. तसेच 'मुंबई मेट्रो रेल्वे तीन' सात आणि एक ह्या महत्वाच्या मेट्रो मार्गिका आहे. त्यासाठी धडाकेबाज रीतीने या शासनाने सर्व प्रकारच्या प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. या प्रकल्पाला जपान सरकारने मोठी मदत केली आहे. आता केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सुरक्षा गार्डवतीने या तीनही ठिकाणची तपासणी होणार आहे, असे सूत्रांकडून समजले आहे.
अर्ध्यामार्गाचे काम : मुंबई महानगरात उपनगरामध्ये अंधेरी ते घाटकोपर ते वर्सोवा अशी एक मेट्रो धावत आहे .ही मेट्रो मार्गे पूर्व मुंबई आणि पश्चिम मुंबईला जोडणारी दुवा आहे. आणि या मेट्रोचा डेपो वर्सोवा येथे अंधेरीच्या जवळपास आहे. तसेच पश्चिम उपनगरामध्ये दहिसर पूर्वपासून ते अंधेरी पूर्व पर्यंतची मेट्रो मार्गीका उभारण्यात आलेली आहे. मेट्रो सात या मार्गावर निम्म्या मार्गाचे काम झालेले आहे, तिथपर्यंत मेट्रो धावत आहे. येत्या काही महिन्यात हे काम पूर्ण होईल.