मुंबई- अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज (शुक्रवारी) केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. यामध्ये कृषी क्षेत्राला अर्थसंकल्पात दिलेले महत्त्व कृषीतज्ज्ञ आणि आयएमसीचे माजी अध्यक्ष सुरेश कोटक यांनी अधोरेखित केले आहे. या अर्थसंकल्पामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचे कोटक म्हणाले.
अर्थसंकल्पामुळे शेती क्षेत्राचा विकास 'फास्ट ट्रक'ने होईल - सुरेश कोटक
अर्थसंकल्पामुळे शेतकरी आणि अर्थव्यवस्था दोघांना फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सुरेश कोटक
अर्थसंकल्पामुळे कृषी क्षेत्र आणि अर्थव्यवस्था दोघांना फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शेतीविषयक धोरणे आणि त्यांची अंमलबजावणी संदर्भातील तरतुदीमुळे हा अर्थसंकल्प वेगळा ठरला आहे. अर्थसंकल्पामध्ये शेतीक्षेत्रासाठी केलेल्या तरतुदीसाठी त्यांनी १० पैकी ९ गुण दिले.