मुंबई:गेली काही दिवस राज्यातील काही जिल्ह्यात तणावाची स्थिती असताना चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे.तुमचा दाभोळकर करू अशी शरद पवारांना 'ट्विटवरून धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणाची खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीरपणे दखल घेत मुंबई पोलीस आयुक्ताकंडे केली तक्रार केली आहे. जर काही घडले तर त्यासाठी सरकार जबाबदार असल्याचे खासदार सुळे यांनी सांगितले. वेबसाईटवरूनही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणाचे घाणेरडे राजकारण बंद व्हावे, अशी अपेक्षा सुळे यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनाही व्हॉट्सअपवर धमकी मिळाली आहे. गृहमंत्र्यांनी पाठपुरावा घेऊन कारवाई करावी, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घ्यावा, अशी मागणी करणार आहे. राज्यात दडपशाही व गुंडगिरीचे राज्य आहे. शरद पवारांना धमकी देणाऱ्या ट्विटवर खूप कॉमेंट आहेत. त्यामधून द्वेष कुठे व कशासाठी पसरविला जात आहे? त्यामागे अदृश्य हात कोणता, हे तपासणे गरजेचे आहे.-खासदार सुप्रिया सुळे
काही घडले तर देशाचे,राज्याचे गृहमंत्री जबाबदारराजकारणात मतभेद असू शकतात. इतका द्वेष ज्या पद्धतीने समाजात पसरला जातो अतिशय दुर्दैवी आहे. प्रसार माध्यमातून बातमी बघितली सोलापूरमध्ये एक मुलगा दोन मुली बरोबर कॉफी पीत होत. तेथे त्याचे प्रोफेसर आले तेही कॉफी घेत होते. त्याच वेळी काही मुलं तिथे आली आणि त्या मुलाला भरपूर मारले. मुलाला काही न विचारता अशा प्रकारे मारणे ही कुठली दडपशाही, गुंडाराज आहे? काय सुरू आहे? सोलापूरसारख्या ठिकाणी दोन मुली, एक मुलगा आणि प्रोफेसर कॉफी पिऊ शकत नसेल तर हे प्रशासनाचे अपयश आहे. हिम्मतच कसे होते की दुसऱ्याच्या मुलाला अशा प्रकारे मारायचे. एक महिला आणि देशाची नागरिक म्हणून मला गृहमंत्र्यांनी न्याय द्याव्या जर काही घडले तर त्याला सर्व जबाबदार देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री असतील, असा इशारा देखील सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.