मुंबई- 'मुंबई-पुणे हायपरलूपसारखा प्रकल्प जगात कुठल्याही देशात कार्यरत नाही. १७ मिनिटात मुंबईहून पुण्याला जाणे, हा आधीच्या सरकारचा कदाचित चुकलेला प्रकल्प असेल. काही प्रकल्प डिजनी लँडमध्येच चांगले दिसतात', असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. महाराष्ट्रात एसटी, उपनगर रेल्वेसह सध्या सुरू असलेले मेट्रोचे प्रकल्प हे प्राधान्याचे विषय आहेत. अनेक प्रकल्प प्रलंबित असताना महागडा हायपरलूप प्रकल्प कशासाठी, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
सोमवारी पार पडलेल्या बैठकीत संसदेमध्ये महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यासह खासदारांची समिती नेमण्याबाबत सहमती झाल्याची माहिती त्यांनी दिली. खासदार अरविंद सावंत यांची समितीचे समन्वयक म्हणून नेमण्यात करण्यात आली आहे.