महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंवर कारवाई करा, सुप्रिया सुळेंचे शरद पवारांना पत्र - सुनील तटकरे

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना पत्र लिहून खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली आहे.

Supriya Sule
सुप्रिया सुळे

By

Published : Jul 3, 2023, 4:35 PM IST

Updated : Jul 3, 2023, 4:56 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित असलेले खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली आहे.

काय आहे पत्रात? : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात, पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी लिहिले आहे की, 'सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी 2 जुलै 2023 रोजी पक्षाची घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन करून पक्षाचे सदस्यत्व सोडले. मी विनंती करते की, आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याबद्दल भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत सक्षम प्राधिकरणासमोर अपात्रतेची याचिका दाखल करावी'.

'हे पक्ष सोडण्यासारखे आहे' : सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, 'पक्षाध्यक्षांच्या माहितीशिवाय किंवा संमतीशिवाय हे पक्षांतर गुप्तपणे केले गेले आहे. ते पक्ष सोडण्यासारखे आहे. ज्यामुळे ते अपात्र ठरत आहेत. हे स्पष्ट झाले आहे की हे खासदार यापुढे राष्ट्रवादीची उद्दिष्टे आणि विचारधारा सामायिक करत नाहीत'. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य शिस्त समितीने महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले म्हणून पक्षाच्या 8 आमदारांवर कारवाई केली आहे. पक्षाने त्यांच्याविरुद्ध पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याबद्दल अपात्र ठरवण्याचा ठराव मंजूर केला आहे.

प्रफुल्ल पटेल शरद पवार यांचे निकटवर्तीय : शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रफुल्ल पटेल यांची गेल्या महिन्यात पक्षाच्या 24 व्या स्थापना दिनी सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तर तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली होती.

हे ही वाचा :

  1. Maharashtra Political Crisis: अनेक आमदारांना परत यायचे आहे; दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल - आ. अनिल देशमुख
  2. Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रानंतर आता बिहारचा नंबर? सुशील मोदी म्हणाले, नितीशकुमारांनी नाक घासले तरी...
  3. Sanjay raut on maharashtra politics crisis : मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना हटविण्यात येणार, 16 आमदार ठरणार अपात्र : संजय राऊत
Last Updated : Jul 3, 2023, 4:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details