मुंबई - महाराणी सईबाईंच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्यासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महारांच्या प्रती आदर, निष्ठा दाखवण्याची हीच संधी असल्याचेही सुळेंनी म्हटले आहे.
महाराणी सईबाईंच्या समाधीस्थळाच्या जीर्णोद्धारासाठी सरकारने निधी द्यावा, सुप्रिया सुळेंची मागणी
महाराणी सईबाईंच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्यासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सईबाईंचे समाधीस्थळ
स्वराज्याची पहिली राजधानी, राजगडाच्या परिसरात छत्रपती शिवरायांच्या अर्धांगिणी महाराणी सईबाई यांची समाधी आहे. त्यांच्या समाधीस्थळाची अतिशय दुरावस्था झाली आहे. तेथील दुरावस्था कोणताही स्वाभिमानी मराठी माणूस सहन करु शकणार नसल्याचे सुळेंनी म्हटले आहे. सरकारने समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. तसेच तेथे सईबाईंचा पुर्णाकृती पुतळा, परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.