मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात ( Jitendra Awhad Molestation Case ) आला. यानंतर पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार असल्याचे सांगत आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा त्यांनी केली. यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पहिली प्रतिक्रिया ( NCP MP Supriya Sule reaction ) दिली. त्याशिवाय पत्नी ऋता आव्हाड यांनीही ट्विटरवरून त्यांचे मत ( Jitendra Awhad Wife Ruta Awhad reaction ) मांडले.
सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया : मुंब्राच्या लोकांनी खूप विश्वासाने त्यांना निवडून दिले आहे. ते मुंब्र्यात अतिशय चांगलं काम करत आहेत. आदर्श आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ नये,” अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली. त्याशिवाय राजकारण ज्या पातळीवर जात आहे याची मला चिंता वाटते. राजकीय क्षेत्रातील सर्व लोकांन याकडे माणूसकीच्या दृष्टीने बघितले पाहिजे,” असेही त्यांनी नमूद केले. तो एकदा नाही, तर पाचवेळा पाहिला. व्हिडीओत मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ हे घडल्याचे दिसत आहे. तिथे प्रचंड गर्दी होती. कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला प्रचंड पोलीस यंत्रणा असते. पोलिसांचा एवढा मोठा ताफा, उत्साही कार्यकर्ते, सहकारी कार्यक्रमाला आले होते. जितेंद्र आव्हाड यांनी त्या गर्दीत माझे सहकारी श्रीकांत यांनाही हात लावला आणि बाजूला केले. समोरून येणाऱ्या त्या महिलेलाही बाजूला केले. त्यामुळे नेमका विनयभंग कसा झाला हे कळत नाही. असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी महिलेची बाजू ऐकून घेतली पाहिजे. विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे टोकाचे पाऊल उचलणे किती योग्य याचा सर्वांनी शांतपणे विचार करायला हवा असे सुप्रिया सुळेंनी नमूद ( NCP MP Supriya Sule reaction ) केले.
ऋता आव्हाड : जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी पत्नी ऋता आव्हाड पुढे आल्या ( Jitendra Awhad Wife Ruta Awhad ) आहेत. त्यांनी ट्विटवर त्यांचे मत व्यक्त केले. ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रीदा रशिद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. NCP व जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत. अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील. ह्या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात. काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडले ती स्पोन्टेनिअस रिऐक्शन होती. त्याला विनयभंग म्हणता येत नाही. असे ऋता आव्हाड ( Ruta Awhad Reaction ) यांनी म्हटले आहे.