महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Supreme Court Hearing On Shiv Sena : शिवसेनेचं चिन्ह, पक्षाबाबत सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी - सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

Supreme Court Hearing On Shiv Sena : शिवसेनेचं चिन्ह आणि पक्षाबाबत सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. 18 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. यामध्ये सुनील प्रभू यांनी 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवरही सुनावणी होणार आहे.

Supreme Court Hearing On Shiv Sena
Supreme Court Hearing On Shiv Sena

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2023, 4:55 PM IST

Updated : Sep 15, 2023, 7:10 PM IST

मुंबईSupreme Court Hearing On Shiv Sena : शिवसेना पक्ष, चिन्हावर 18 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्यांच्या पुनर्विचार याचिकेवरही 18 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

सुनावणीकडं शिवसेना, ठाकरे गटाचं लक्ष : या सुनावणीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. विशेषत: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी होणार असताना आता सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा निर्णय आल्यानंतर शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतच्या सर्व चर्चा थांबल्या होत्या. मात्र, आता पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव, चिन्ह वापरण्याचे अधिकार शिंदे गटाला दिले आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

दोन याचिकांवर होणार सुनावणी :सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह जे. बी. पार्डीवाल, मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. या याचिकांची 18 तसंच 19 असे अनुक्रमे नंबर आहेत. सत्तासंघर्षाच्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत तातडीनं निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारी आणखी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सुनील प्रभू यांच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरही सुनावणी होणार आहे. त्यामुळं या याचिकांवर एकामागे एक सुनावणी होईल. या सुनावणीत नेमकं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट :शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली आहे. या पक्षातील दोन गटांमध्ये कायदेशीर लढाईही सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात 6 ऑक्टोबरला महत्त्वाची सुनावणी होण्याची शक्यता असून, दोन्ही गटांना 6 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू; कपिल सिब्बल यांचा ठाकरे गटाकडून जोरदार युक्तीवाद
  2. Hearing On Shiv Sena : सत्तासंघर्षावर 21 फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी
  3. Hearing On Shiv Sena: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष! सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला
Last Updated : Sep 15, 2023, 7:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details